धर्मेंद्र यांच्या अटीमुळे बॉबी देओलची ‘अधुरी प्रेम कहाणी’; आज असता प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती

बॉलिवूडमध्ये कायम चर्चा रंगत असते ती म्हणजे सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल, वडिलांमुळे होवू शकलं नाही बॉबी देओल याचं 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न; पाच वर्ष एकमेकांना डेट केलं, गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली आणि...

धर्मेंद्र यांच्या अटीमुळे बॉबी देओलची 'अधुरी प्रेम कहाणी'; आज असता प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती
धर्मेंद्र यांच्या अटीमुळे बॉबी देओलची 'अधुरी प्रेम कहाणी'; आज असता प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 8:50 AM

Happy Birthday Bobby Deol : बॉलिवूडमध्ये कायम चर्चा रंगत असते ती म्हणजे सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्याबद्दल. ९० दशकातील अनेक सेलिब्रिटीच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात कायम आहेत. अशाच अभिनेत्यांन पैकी एक म्हणजे अभिनेता बॉबी देओल (Bobby deol). एक काळ असा होता, जेव्हा बॉबी देओल याने त्याच्या काही सिनेमांमुळे चाहत्यांच्या मनात घर केलं. तेव्हा अभिनेता फक्त त्याच्या सिनेमांमुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला. बॉबीची ‘अधुरी प्रेम कहाणी’ फार कमी लोकांना माहिती असेल. बॉबीने तान्या देओल (Tanya Deol) सोबत लग्न केलं, पण अभिनेत्याच्या मनात होती अभिनेत्री नीलम कोठारी (Neelam Kothari).

बॉबी देओलच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेवू नीलम कोठारी आणि बॉबी देओल यांच्या अधुऱ्या प्रेम कहाणीबद्दल. नीलम कोठारी आणि बॉबी देओल यांनी जवळपास ५ वर्ष एकमेकांना डेट केलं. पण धर्मेंद्र यांना दोघांचं नातं मान्य नव्हतं. धर्मेंद्र दोघांच्या नात्याच्या विरोधात होते. बॉलिवूडमधील अभिनेत्रीसोबत बॉबीने लग्न केल्याचं धर्मेंद्र यांना मान्य नव्हतं असं सांगण्यात येतं.

एका मुलाखतीमध्ये खुद्द नीलम कोठारी हिने बॉबी देओल याच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला. अभिनेत्री म्हणाली, ‘मी कधीही बॉबीच्या आई-वडिलांना भेटली नाही. बॉबीने कधी आमच्या नात्याबद्दल वडील धर्मेंद्र आणि आई प्रकाश कौर यांना काही सांगितलं असावं, हे देखील मला माहिती नव्हतं. कारण याबाबतीत त्याने मला काहीही सांगितलं नव्हतं.’

हे सुद्धा वाचा

रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांनी बॉबीला नीलम हिच्यापासून दूर राहण्यास सांगितलं होतं. यावर नीलम कोठारी म्हणाली, ‘मी बॉबी देओलसोबत आनंदी नव्हती. त्यामुळे दोघेही परस्पर संमतीने वेगळे झालो.’ निलमसोबत ब्रेकअप झाल्यानंतर बॉबी याने १९९६ साली तान्यासोबत लग्न केलं. आता बॉबी तान्यासोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे.

बॉबी देओल याचे सिनेमे

बॉबी देओल याने करियरची सुरुवात लहानपणापासून केली. ‘धर्मवीर’ सिनेमात अभिनेत्याने बालकलाकार म्हणून भूमिका पार पाडली. त्यानंतर बॉबीने बॉलिवूडमध्ये ‘बरसात’ सिनेमातून पदार्पण केलं. त्यांनंतर बॉबीने कधीही मागे वळून पाहिलं नाही. यासाठी अभिनेत्याला फिल्मफेयर बेस्ट मेल डेब्यू अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं.

पुरस्कार मिळाल्यानंतर बॉबीने ‘सोल्जर’, ‘बादल’, ‘बिच्छू’, ‘हमराज’ आणि ‘अजनबी’ सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली. सिनेमांनी चाहत्यांच्या मनात राज्य केलं. एवढंच नाही तर, मोठ्या पद्यावर ओळख निर्माण केल्यानंतर बॉबीने ओटीटी प्लॅटफॉर्मदेखील स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. ‘आश्रम’ या वेब सीरिजमुळे बॉबी पुन्हा चर्चेत आला.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.