
अभिनेता विकी कौशल सध्या ‘छावा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमाने भारतातच नाही तर, जगभरात अनेक नवीन विक्रम रचले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यावर आधारलेल्या सिनेमात विकी याने महाराजांच्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि अभिनेत्याचा प्रयत्न यशस्वी देखील ठरला आहे. सिनेमा लवकरच बॉक्स ऑफिसवर 500 कोटींपर्यंत मजल मारेल असं देखील सांगण्यात येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विकी कौशल याची चर्चा रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून विकी ‘छावा’ सिनेमामुळे चर्चेत आहे. पण एक काळ असा देखील होता, जेव्हा विकी त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला होता. 2019 पूर्वी विकीच्या आयुष्यात एक खास व्यक्ती होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
2019 पूर्वी विकी ज्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये होता, त्या अभिनेत्रीचं नाव हरलीन सेठी आहे. तेव्हा हरलीन आणि विकी यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील तुफान व्हायरल झाले होते. दरम्यान ब्रेकअपनंतर हरलीन हिला विकी कौशलची एक्स गर्लफ्रेंड म्हणून बोलवण्यात आलं यावर हरलीनने मौन सोडलं. शिवाय अभिनेत्रीने ब्रेकअपचं कारण कतरिना होती का? यावर देखील मोठा खुलासा केला.
हरलीन मुलाखतीत म्हणाली होती, ‘माझ्या इंस्टाग्राम बायोमध्ये दोन शब्द आहेत, ‘आय एम…’ पुढे काही नाही. ‘आय एम…’ म्हणजे मी एक मजबूत स्त्री आहे. मी खूप मेहनती आहे. मी स्वत:ला अभिनेत्रीही मानत नाही. मी कोणाची तरी मुलगी आहे, मी आई होऊ शकते.
अभिनेत्री पुढे म्हणाली, ‘मला एक्स गर्लफ्रेंड हा लेबल बिलकूल आवलेला नाही. माहिती नाही लोकांना का मला हा लेबल द्यायचा आहे. मला स्वतःला कोणाशीही जोडून घ्यायला आवडत नाही…’ असं देखील हरलीन म्हणाली होती.
हरलीन सेठीने विकी कौशलला त्याच्या संघर्षाच्या दिवसात साथ दिली. कतरिना कैफमुळे हरलीन आणि विकी यांचं ब्रेकअप झालंस असं म्हटले जातं. पण यामध्ये काहीही तथ्य नाही. विकी बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचत होता आणि हरलीन मागे राहिली.
यावर हरलीन म्हणाली, ‘‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ सिनेमाच्या यशानंतर विकीच्या वागणुकीत अनेक बदल झाले. विकी माझ्यापासून दूर होऊ लागला आणि त्यानंतर कधी परतलाच नाही…’ असं देखील हरलीन म्हणाली होती .
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी 9 डिसेंबर 2021 मध्ये मोठ्या शाही थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आता देखील विकी आणि कतरिना एकमेकांसोबत फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.