AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अप्पी आमची कलेक्टर’ फेम अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू, इंडस्ट्रीवर शोककळा

मराठी मालिका विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. 'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्याच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर इंडस्ट्री आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला असून. अभिनेत्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नांदेड येथे झालेल्या अपघातात अभिनेत्याने शेवटचा श्वास घेतला आहे.

'अप्पी आमची कलेक्टर' फेम अभिनेत्याचा रस्ते अपघातात मृत्यू, इंडस्ट्रीवर शोककळा
| Updated on: Feb 25, 2025 | 2:09 PM
Share

‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत भूमिका साकारणारे अभिनेते संतोष हणमंत नलावडे यांच रस्ते अपघातातस निधन झालं आहे. संतोष यांनी वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नांदेड येथे रस्ते अपघातात संतोष यांचं निधन झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड येथे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेसाठी गेले असताना त्यांचा अपघात झाला. अपघातात संतोष गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारा दरम्यान अभिनेत्याचं निधन झालं. सोमवारी संतोष यांनी अखेरचा श्वास घेतला. संतोष यांच्या निधनानंतर मित्रपरिवार आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. संतोष नलावडे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात रेकॉर्ड विभागात कार्यरत होते.

संतोष नलावडे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अनेक नाटकांमध्ये देखील काम केलं होतं. नोकरी सांभाळत त्यांनी स्वतःची अभिनयाची आवड देखील जोपासली. संतोष यांनी अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेशिवाय संतोष यांनी ‘शेतकरी नवरा हवा’, ‘लाखात एक आमचा दादा’, ‘मन झालं बाजींद’, ‘कॉन्स्टेबल मंजू’, ‘लागीर झालं जी’ यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. आता संतोष नलावडे यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी