
Esha Deol On Dharmendra : बॉलिवूडचे दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर चाहत्यांना आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. धर्मेंद्र आता या जगता नाहीत, हे सत्य अद्यापही कुटुंबियांना स्वीकारणं अवघड आहे… अशात अभिनेत्री आणि धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिने सोशल मीडियावर एक पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहे… अद्यापही स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहोत… असं वक्तव्य ईशा हिने केलं आहे. सध्या सर्वत्र ईशा हिच्या पोस्टची चर्चा सुरु आहे…
वडील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट करत ईशा म्हणते, ‘काही कामांसाठी मी एक ठरावीक वेळ दिलेला… मी गेल्या काही दिवसांपासून सर्व कामं थांबवून ठेवली होती… जे मी येणाऱ्या काही दिवसांत तुमच्यासोबत शेअर करेल… माणुसकीच्या नात्याने तुम्ही मला समजून घ्याल… अशी अपेक्षा करते… पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एक मुलगी म्हणून मला समजून घ्या… जिने सर्वात प्रेमळ वडिलांना गमावलं आहे…’
पुढे ईशा म्हणते, ‘हे नुकसान कधीच भरलं जाऊ शकत नाही… माझ्या हातात असतं तर, काही दिवस आणखी ब्रेक घेतला असता… पण असं करु शकत नाही… तुम्हा सर्वांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल शुभेच्छा…’ असं देखील ईशा पोस्टमध्ये म्हटली आहे…
सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांचं निधन झालं. पण तेव्हा कुटुंबियांकडून कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आली नाही… तेव्हा अभिनेत्री हेमा मालिनी आणि ईशा यांनी स्मशनाभूमीत जाताना स्पॉट करण्यात आलं. अशात अनेक चर्चांना उधाण आलं.
हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुलींना शेवटच्या क्षणी देखील धर्मेंद्र यांच्यापासून दूर ठेवण्यात आलं… असं सांगण्यात आलं… तर 27 नोव्हेंबर रोजी देओल कुटुंबियांनी शोक सभेचं आयोजन केलं होतं. तेव्हा अनेक सेलिब्रिटींनी धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हजेरी लावली. पण त्याठिकाणी हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली दिसल्या नाहीत. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी हेमा मालिनी यांनी दिल्ली याठिकाणी शोक सभेचं आयोजन केलं. तिथे देओल कुटुंबातील एकही व्यक्ती उपस्थित नव्हती.