करोडपतीशी लग्न झालं असलं तरी…, ईशा देओलचा घटस्फोट, हेमा मालिनी यांनी दिलेला ‘तो’ सल्ला

Esha Deol Divore: ईशा देओलचा पूर्व पती थाटणार दुसरा संसार, घटस्फोटानंतर हेमा मालिनी लेक ईशाला म्हणाल्या, 'करोडपतीशी लग्न झालं असलं तरी...', सध्या सर्वत्र ईशा देओल हिच्या खासगी आयुष्याची चर्चा...

करोडपतीशी लग्न झालं असलं तरी..., ईशा देओलचा घटस्फोट, हेमा मालिनी यांनी दिलेला तो सल्ला
फाईल फोटो
| Updated on: Aug 30, 2025 | 12:25 PM

Esha Deol Divore: अभिनेत्री ईशा देओल आणि उद्योजक भरत तख्तानी यांनी लग्नाच्या 11 वर्षांनंतर म्हणजे 2024 मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर भरत तख्तानी याच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. सोशल मीडियावर एका तरुणीसोबत फोटो पोस्ट करत भरत याने ‘तुझं माझ्या कुटुंबात स्वागत…’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. सध्या सर्वत्र त्याच मिस्ट्री गर्लची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे, जेव्हा ईशा आणि भरत यांचा घटस्फोट झाला तेव्हा अभिनेत्री हेमा मालिनी यांनी लेकीला एक सल्ला दिला होता.

घटस्फोटानंतर दिलेल्या एका मुलाखतीत ईशा म्हणाली, ‘मला असं वाटतं की, प्रत्येक आई आपल्या मुलीला एक गोष्ट कायम सांगत असते आणि ती म्हणजे आपली वेगळी ओळख कशी निर्माण केली पाहिजे. माझ्या आईने देखील मला हेच सांगितलं आहे. माझ्या आईने मला एकच गोष्ट सांगितली आहे आणि ती म्हणजे कष्ट करुन स्वतःचं नाव मोठं करायचं.. आई मला म्हणाली, तुझं देखील एक प्रोफेशन आहे. तू नाव कमावलं नसलं तरी, एका प्रोफेशनमध्ये तू आहेस. ते कधीच सोडायचं नाही… कायम प्रयत्न केले पाहिजे… काम करत राहिलं पाहिजे…’

 

 

ईशा पुढे म्हणाली, ‘आईने एक महत्त्वाची गोष्ट समजावली आहे. करोडपतीसोबत लग्न झालेलं असलं तरी, आर्थिक गरजांसाठी कोणावर अवलंबून राहायचं नाही… जेव्हा एक महिला आर्थिकरित्या भक्कम असते. तेव्हा ती महिला फार वेगळी असते… एवढंच नाही तर, आणखी एक महत्त्वाची गोष्ट आईने मला सांगितली, आपण काम करतो, स्वतःचा सांभाळ करतो… पण रोमान्स मागे सोडतो… आयुष्यत रोमान्स कधीच संपला नाही पाहिजे… रोमान्सच एक अशी गोष्ट आहे, ज्यामुळे तुमच्या पोटत फुलपाखरु उडू लागतो… आईने मला अनेक सल्ले दिले. पण ते मी कधीच त्यांची अंमलबजावणी केली नाही…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

ईशा देओल आणि भरत तख्तानी यांचं लग्न

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर भरत आणि ईशा यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 2 मुलींच्या जन्मानंतर ईशा आणि भरत विभक्त झाले. पण घटस्फोटाच्या जवळपास 18 महिन्यांनंतर भरत याने दुसऱ्या प्रेमाची कबुली दिली आहे. सध्या सर्वत्र ईशा देओल हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.