
Hema Malini – Dharmendra : दिग्गज अभिनेते धर्मेंद आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. समाजाचे सर्व नियम मोडत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी 1980 मध्ये लग्न केलं. पण धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर सर्वत्र खळबळ माजली. धर्मेंद्र यांच्यासबोत लग्न केल्यानंतर हेमा मालिनी यांनी वैवाहिक आयुष्यात अनेकदा तडजोड करावी लागली. कारण धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न झालेलं होतं आणि धर्मेंद्र चार मुलांचे वडील होते.
पहिली पत्नी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. दोघांचा मोठा निर्णय धर्मेंद्र यांच्या वडिलांना देखील मान्य नव्हता. पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर प्रकाश कौर यांना देखील फार मोठा धक्का बसला.
पण सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे, लग्नानंतर हेमा मालिनी यांच्या मुख्य घरी गेल्या नाहीत. हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केल्यानंतर धर्मेंद्र यांनी नवीन घर खरेदी केलं. लग्नाच्या जवळपास 46 वर्षांनंतर देखील आपर्यंत हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या जुन्या घरी पाय ठेवलेला नाही.
धर्मेंद्र यांचा भाऊ अजीत देओल यांची प्रकृती 2015 साली खालावली होती. त्यांची विचारपूस करण्यासाठी ईशा आणि अहाना दोघी प्रकाश कौर यांच्या घरी गेल्या होत्या. तेव्हा अभिनेता सनी देओल सोबत आई प्रकाश कौर यांना ईशा पहिल्यांदा भेटली होती. तेव्हा 87 वर्षीय धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना स्वतःच्या मुलीसारखं प्रेम केलं होतं… असं देखील सांगितलं जातं…
सांगायचं झालं तर, हेमा मालिनी यांनी देखील त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार मोठे खुलासे केले आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या पण दोघांनी कधीच एकमेकांची साथ सोडली नाही. आज धर्मेंद्र रुग्णालयात आहेत आणि त्यांच्यासोबत हेमा मालिनी आणि कुटुंबातील इतर सदस्य देखील रुग्णालयात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अनेक अफवा देखील पसरत असताना, ‘धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत…’ अशी माहिती हेमा मालिनी आणि त्यांची मुलगी ईशा देओल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.