
Hema Malini – Dharmendra : अभिनेते धर्मेंद्र आता मोठ्या पडद्यावर पूर्वीप्रमाणे सक्रिय नसले कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे सक्रिय असतात. धर्मेंद्र सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. अशात दोन दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली. ज्यामुळे चाहत्यांच्या मनात देखील भीती निर्माण झाली. पण आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. धर्मेंद्र यांच्या प्रकृतीची चिंता चाहत्यांना सतावत असताना अभिनेत्री हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोमवारी हेमा मालिनी यांना मुंबईच्या विमानतळावर स्पॉट करण्यात आलं. तेव्हा पापाराझींनी हेमा मालिनी यांना धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल विचारलं. यावर हेमा मालिनी म्हणाल्या, ‘ते आता ठिक आहेत…’, एवढंच नाही तर, हेमा मालिनी यांनी देवाचे हात जोडून आभार देखील मानले.
सध्या हेमा मालिनी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. पण व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना हेमा मालिनी यांच्यावर निशाना साधला आहे. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘नवरा आजारी आहे आणि हेमा मालिनी विमानतळावर आहेत…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘नवरा आजारी आहे हे त्यांना कसं कळतं.. त्यांच्याकडे स्वतःसाठी वेळ नाही…’
धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. आरोग्याच्या समस्यांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रूटीन चेकअप साठी त्यांना रूग्णालयात नेले असल्याचे समोर आलं होतं. आता धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
धर्मेंद्र आजही मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत. अभिनेते अगस्त्य नंदाच्या इक्कीस सिनेमात झळकणार आहेत. आतापर्यंत त्यांनी आपल्या कारकिर्दीत 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. यातील फूल पत्थर, चुपके चुपके, शोले आणि धरम वीर या सुपपहीट चित्रपटांचा समावेश आहे.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची पहिल्यांदा भेट 1970 मध्ये ‘तुम हसीन मैं जवान’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झाली. हेमा यांच्या घरातून लग्नाला विरोध असतानाही दोघंही आपल्या निर्णयावर ठाम होते. इतकंच नव्हे तर हेमा यांच्याशी लग्न करताना धर्मेंद्र हे विवाहित होते. प्रकाश कौर या धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी आहेत. 1980 मध्ये धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं.