
ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचा प्रकृती बिघडल्याने सगळेच चिंतेत होते. चाहत्यांनी देखील त्यांच्या प्रकृतीमुळे चिंतेत होते. धर्मेंद्र यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांची तब्येतीत सुधारणा असून त्यांना घरी आणण्यात आलं आहे. या बातमीने सर्वांनाच दिलासा मिळाला. धर्मेंद्र पूर्णपणे स्वस्थ होऊन घरी परतले आहेत. तसेच धर्मेंद्र यांच्या 90 व्या वाढदिवसाची जय्यत तयारी त्यांच्या कुटुंबाने सुरुवातही केली आहे.
धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्यही फारच चर्चेत राहिलं आहे
दरम्यान, धर्मेंद्र यांचे वैयक्तिक आयुष्यही फारच चर्चेत राहिलं आहे. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची प्रेम कहाणी चर्चेत राहिली आहे. धर्मेंद्र यांचे चाहते त्यांच्या पहिल्या पत्नी आणि पहिल्या लग्नाबद्दलही लहान-मोठी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यास उत्सुक असतात. हेमा मालिनीशी लग्न करण्यापूर्वी धर्मेंद्र यांचे प्रकाश कौर यांच्याशी लग्न झाले होते. 1954 मध्ये प्रकाश कौर यांच्याशी लग्न झाले होते.
धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या लग्नावेळी हेमा यांचे वय किती होते?
जेव्हा हेमा मालिनी यांच्याशी लग्न करायचे होते तेव्हा त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रकाश कौर घटस्फोट देण्यास तयार नसल्याने हेमा यांच्याशी लग्न करण्यासाठी धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. पण हे अनेकांना माहित नसेल की त्यांचे आणि प्रकाश कौर यांचे लग्न झाले तेव्हा हेमा मालिनी किती वर्षांच्या होत्या ते. हे जाणून आश्चर्य वाटेल की धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या लग्नावेळी हेमा मालिनी फक्त सहा वर्षांच्या होत्या. धर्मेंद्र यांच्याशी झालेल्या पहिल्या लग्नाच्या वेळी, त्या शाळेत जात होत्या. हेमा मालिनी यांनी 12 वी पर्यंत डीटीईए मंदिर मार्ग येथे शिक्षण घेतले. त्यानंतर, अभिनय करण्यासाठी तिने शाळा सोडली.
धर्मेंद्र हे आधीच विवाहित असल्याचं हेमा मालिनी यांना माहित होते
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या वयात तब्बल 13 वर्षांचे अंतर आहे. धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्याशी पहिले लग्न केले तेव्हा ते देखील फक्त 19 वर्षांचे होते. हेमा मालिनी यांनी देखील जेव्हा धर्मेंद्र यांच्याशी लग्नाचा विचार केला तेव्हा धर्मेंद्र हे आधीच विवाहित आहेत हे माहित होते. त्यांच्यात १३ वर्षांचा फरक आहे याचा त्यांनी फार विचार केला नाही कारण तेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे एकमेकांच्या प्रेमात होते. सगळ्यांच्या विरोधात जाऊन दोघांनी लग्न केलं.