AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिना खान पोहचली थेट मुंबईच्या माहिम दर्ग्यात, ‘त्या’ गोष्टीमुळे नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल

हिना खान हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. हिना खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हिना खान ही कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते.

हिना खान पोहचली थेट मुंबईच्या माहिम दर्ग्यात, 'त्या' गोष्टीमुळे नेटकऱ्यांनी सुनावले खडेबोल
| Updated on: Nov 03, 2023 | 2:49 PM
Share

मुंबई : हिना खान हिला खरी ओळख ही ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून मिळालीये. हिना खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हिना खान ही नुकताच हजरत मखदूम शाह बाबा दरगाह माहिम मुंबई येथे गेली. माहिम दरगाह येथील अनेक फोटो हे हिना खान हिने सोशल मीडियावर शेअर केल्याचे बघायला मिळतंय. यावेळी हिना खान ही काळ्या रंगाच्या बुरख्यात दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने खास कॅप्शन देखील शेअर केले.

हिना खान ही हजरत मखदूम शाह बाबा दरगाह माहिम येथे नमाजसाठी गेली. हे फोटो शेअर करत तिने एका खास व्यक्तीची आठवण काढल्याचे देखील दिसत आहे. हिना खान हिने लिहिले की, हजरत मखदूम शाह बाबा दरगाह माहीम येथे फजरची नमाज अदा केली. मी माझ्या आयुष्यात ज्या दर्ग्यांना भेट दिली तिथे मला नेहमीच शांतता मिळाली.

माझ्या आजीचे खूप आभार. मी लहान असताना मला श्रीनगरला ती प्रत्येक दर्ग्यात घेऊन जायची. आता हिना खान हिने शेअर केलेली ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. लोक हिना खान हिच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये हिना खान हिने अजिबात मेकअप केला नसल्याचे बघायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by Hina Khan (@realhinakhan)

हिना खान हिच्या पोस्टवर अनेकजण कमेंट करत आहेत. मात्र, हिना खान हिने शेअर केलेले हे फोटो अनेकांना आवडले नसल्याचे दिसत आहे. काहींनी अशाप्रकारे दिखावा करण्याची काय गरज आहे असेही म्हटले आहे. काही दिवसांपूर्वीच हिना खान हिने हिजाबमधील काही फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले.

हिना खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हिना खान हिने टीव्ही मालिकांमध्ये एक मोठा काळ गाजवलाय. हिना खान सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसते. हिना खान आपल्या चाहत्यांसाठी खास बोल्ड आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. विशेष म्हणजे हिना खान बिग बाॅसमध्ये देखील धमाका करताना दिसली. सलमान खान याच्या चित्रपटामध्ये हिना खान दिसणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?