‘पाठ्यपुस्तकात मुघलांवर 8 धडे आणि आपल्यावर फक्त 1…’, आर माधवनने वास्तवावर ठेवलं बोट

R Madhavan: इतिहासाबद्दल आर माधवनचं लक्षवेधी वक्तव्य, 'पाठ्यपुस्तकात मुघलांवर 8 धडे आणि आपल्यावर फक्त 1...', NCERT च्या निर्णयानंतर अभिनेत्याचा सवाल, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आर माधवन याच्या वक्तव्याची चर्चा...

पाठ्यपुस्तकात मुघलांवर 8 धडे आणि आपल्यावर फक्त 1...,  आर माधवनने वास्तवावर ठेवलं बोट
| Updated on: May 03, 2025 | 9:30 AM

R Madhavan: शालेय शिक्षणात मुघलांवर 8 धडे आणि आपल्यावर फक्त 1… असं का? असं म्हणत अभिनेता आर माधवन याने प्रश्न उपस्थित केले आहेत. सांगायचं झालं शालेय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये केलेल्या बदलांमुळे एनसीईआरटीवर टीका होत असताना अभिनेत्याने लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मुघल राजवंशाबद्दल अधिक माहिती देण्यात आलीये असं म्हणत अभिनेत्याने आश्चर्य व्यक्त केला आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत आर माधवन शालेय इतिहासाच्या पुस्तकांबद्दल म्हणाला, ‘माझं वक्तव्य कदाचित त्रासदायक ठरु शकतं, पण तरी देखील मी बोलेल. जेव्हा मी पुस्तकांमधील इतिहास वाचला. तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली, आपल्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात मुघलांवर 8 धडे मात्र हडप्पा आणि मोहेंजोदारो संस्कृतींवर दोन धडे होते. ब्रिटिश राजवट आणि स्वातंत्र्यलढ्यावर चार धडे होते आणि दक्षिणेकडील राज्यांवर – चोळ, पांड्य, पल्लव यांच्यावर फक्त एक धडा…’

‘मुघल आणि इंग्रजांनी आपल्या देशावर जवळपास 800 वर्ष राज्य केलं असले. तर चोळ साम्राज्याला 2,400 वर्षांचा इतिहास आहे. समुद्र सफर आणि नाविक दलाचा पाया चोळ साम्राज्यात घालण्यात आला. एवढंच नाही तर, त्यांचा मसाल्याच व्यवसाय रोमपर्यंत पसरलेला.’

‘चोळ साम्राज्याचा सांस्कृतिक आणि धार्मिक प्रभाव संपूर्ण कोरियामध्ये पसरला आहे, तरीही हा समृद्ध इतिहास फक्त एका धड्यापुरता मर्यादित आहे. असा अभ्यासक्रम कोणी ठरवला? तमिळ ही जगातील सर्वात जुनी भाषा आहे, पण त्याबद्दल कोणालाही माहिती नाही. आपल्या संस्कृतीत लपलेल्या वैज्ञानिक ज्ञानाची आता थट्टा केली जात आहे…’ असं देखील अभिनेता यावेळी म्हणाला.

एनसीईआरटी बद्दल काय वाद आहे?

माधवनने इतिहासावर विधान अशा वेळी केलं आहे जेव्हा एनसीईआरटीने इयत्ता 7 वी च्या इतिहासाच्या पुस्तकांमधून मुघल साम्राज्य आणि दिल्ली सल्तनतचे सर्व संदर्भ काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या विषयांऐवजी भूगोल, महाकुंभ उत्सव आणि मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ, बेटी पढाओ सारख्या सरकारी योजनांवरील धडे देण्यात आले आहेत. या निर्णयाचं अनेकांना समर्थन केलं आहे तर, अनेकांनी यावर टीका केली आहे.