AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रात्रीस खेळ चाले’मधील अण्णा नाईकांना ‘देवमाणूस’मधील भूमिका कशी मिळाली? खूपच रंजक किस्सा

'देवमाणूस- मधला अध्याय' ही मालिका दररोज रात्री 10 वाजता झी मराठी वाहिनीवर 2 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत किरण गायकवाडने पुनरागमन केलं आहे. याआधीच्या दोन्ही सिझन्समध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती.

'रात्रीस खेळ चाले'मधील अण्णा नाईकांना 'देवमाणूस'मधील भूमिका कशी मिळाली? खूपच रंजक किस्सा
माधव अभ्यंकरImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 05, 2025 | 1:37 PM
Share

‘देवमाणूस- मधला अध्याय’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून त्याच्या नवीन भागात काय होणार याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यातील प्रत्येक पात्र आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. त्यापैकी ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर यांना मालिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकांची वेगळीच उत्सुकता आहे. या मालिकेत ते गोपाळचे वडील हिम्मतराव देशमुखची भूमिका साकारत आहेत. त्यांना मालिकेत सर्वजण अप्पा म्हणून ओळखतात. हिम्मतराव पेशाने पैलवान आणि शेतकरी आहे. जरी आता तो कुस्ती खेळत नसला तरी एका काळात त्याने अनेकांना मातीत लोळवलं आहे. हे अतिशय इरसाल पात्र आहे. रंजना आणि फुलादेवी या अप्पाच्या दोन बायका आहेत. त्याला बायकांबद्दल थोडं जास्त आकर्षण आहे, त्यासाठी त्याने आपली संपत्ती आणि पैसे खर्ची घातलं आहे.

याआधी माधव अभ्यंकर यांनी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेत अण्णा नाईकची भूमिका साकारली होती. ती भूमिका अजूनही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. म्हणूनच ‘देवमाणूस’चा प्रोमो आला तेव्हा ‘अण्णा इज बॅक’ हीच चर्चा सुरू होती. मालिकेतील अनोख्या भूमिकेविषयी ते म्हणाले, “मी जेव्हा अण्णाची भूमिका साकारत होतो, तेव्हा मला मालवणी भाषा शिकावी लागली होती. त्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली होती. कोणतीही भूमिका करताना मेहनत ही करावीच लागते. मग ती बॉडी लँग्वेज, लूक किंवा भाषा असो. या सर्वात भाषा हा अतिशय महत्वाचा भाग असतो. ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या वेळी मला मालवणी येत नव्हतं, पण मी त्यावर काम केलं. आता हिम्मतराव या भूमिकेसाठी मला साताऱ्याची भाषा बोलायची आहे. या भाषेचाही एक लहेजा आहे.”

“मी सेटवर गावातल्या माणसांबरोबर गप्पा मारतो आणि त्यांची बोलायची पद्धत, त्यांचा संवाद कसा आहे याचा अभ्यास करतो. तेच भूमिकेत आत्मसात करतो. ही मालिका मला कशी मिळाली याचा किस्सा सांगायचं झाला तर मला मालिकेची निर्माती श्वेता शिंदेचा मेसेज आला. सर, तुम्ही सध्या काय करत आहात, असं तिने मला विचारलं. मी तिला सांगितलं की नुकतंच माझ्या एका प्रोजेक्टचं काम संपलं आहे. तेव्हा श्वेता मला म्हणाली की, सर.. तुम्हाला मी विचारात नाही, थेट सांगतेय की तुम्ही कोणालाच डेट देऊ नका. मी तुमच्यासाठी ‘देवमाणूस’मध्ये एक भूमिका क्राफ्ट केली आहे. त्यानंतर ऑडिशन आणि लूक टेस्ट झाली. आता या नवीन भूमिकेमध्ये मला लोक स्वीकारतीलच याची मला शंभर टक्के खात्री आहे. मला स्वतःला ही उत्सुकता आहे की मालिकेमध्ये पुढे काय होणार? मलाही आव्हानात्मक काम करायचं आहे. म्हणजे भूमिकेवर काम करताना घामटा सुटला पाहिजे”, असं त्यांनी सांगितलं.

BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?
BMC साठी भाजपची टीम सज्ज, 20 जणांची समिती जाहीर; कोणा-कोणाचा सहभाग?.
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.