‘या’ अभिनेत्रीमुळे देशात वाढली होती कंडोमची विक्री, बदलला लोकांचा दृष्टिकोन

नव्वदच्या दशकात, एका अभिनेत्रीने कामसूत्र कंडोमची पहिली जाहिरात करून भारतातील कंडोमबाबतची मानसिकता बदलण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यावेळी कंडोमची जाहिरात करणे अत्यंत वादग्रस्त मानले जात असे. मात्र या अभिनेत्रीने ही जाहिरात केली आणि कंडोमच्या विक्रित मोठी वाढ झाली. देशात कंडोमबाबतची मानसिकताच बदलून गेली.

या अभिनेत्रीमुळे देशात वाढली होती कंडोमची विक्री, बदलला लोकांचा दृष्टिकोन
| Updated on: Feb 27, 2025 | 1:21 PM

आता टेलिव्हिजनवर सर्सासपणे कंडोमच्या जाहिराती दाखवल्या जातात. आणि त्याबद्दल पहिल्यासारखं तरी वातावरण नाही. म्हणजे लोक त्या जाहिराती इतर जाहिरातींप्रमाणेच पाहतात. तसेच आता लोकांच्या विचारांमध्ये तेवढी सुधारणा झाली आहे की मेडिकलमध्ये जाऊन ते खरेदीही करतात. पण पूर्वी तसं नव्हतं. कंडोम हा शब्द उच्चारायलाही लोक लाजत असतं. कंडोम हे तर पाहायला गेलं तर फार पूर्वीपासून बाजारात आहेत पण त्या काळी ते तेवढे विकत घेतले जात नसतं पण एका अभिनेत्रीमुळे हे सर्वच बदललं.

मानसिकतेत मोठा बदल घडवला होता.

एसटीडीसारख्या रोगांपासून बचाव करण्यासाठी आणि कुटुंब नियोजनासाठी उपयुक्त असलेले कंडोम आज सहज उपलब्ध असतात, पण पूर्वी तसे नव्हते. भारतात पहिल्यांदा जर कोणी कंडोमची ओळख करून दिली असेल तर ते एका अभिनेत्रीच्या जाहिरातीमुळे. होय, या अभिनेत्री पहिल्यांदा कंडोमची जाहिरात केली आणि आश्चर्य म्हणजे ती जाहिरात पाहून देशात कंडोमची विक्री झपाट्याने वाढली. या अभिनेत्रीच्या जाहिरातीमुळे कंडोमबाबत लोकांच्या मानसिकतेत मोठा बदल घडवला होता.

कंडोम जाहिरातीत पहिल्यांदा काम करणारी अभिनेत्री

या जाहिरातीत पहिल्यांदा काम करणारी अभिनेत्री होती पूजा बेदी, जी कबीर बेदी आणि प्रसिद्ध नृत्यांगणा, मॉडेल प्रोतिमा यांची लेक. तिच्या फिल्मी करिअरपेक्षा खाजगी कारणांमुळेच ती जास्त चर्चेत राहीली. विशेष म्हणजे वयाच्या ४७ व्या वर्षी पूजा बेदी लग्नबंधनात अडकली होती. 2003 साली पूजाने पहिला पती फरहान फर्नीचरवालाशी घटस्फोट घेत वेगळी झाली होती. पूजाच्या पहिला घटस्फोटाला आता 18 वर्ष झाली आहेत.‘जो जीता वहीं सिकंदर’ या सिनेमाने पूजाला खरी ओळख मिळवून दिली.

कामसूत्रची जाहिरात खूप वादग्रस्त ठरली होती

पूजाने केलेली कामसूत्रची जाहिरात खूप वादग्रस्त ठरली होती. कामसूत्र कंडोमच्या जाहिरातीत तिच्यासोबत मॉडेल मार्क रॉबिनसन दिसला होता. जाहिरातीला दूरदर्शनवर बॅन करण्यात आलं होतं. बाकीच्या अनेक चॅनल्सनी देखील ही जाहिरात चालवण्यास नकार दिला होता. त्यावेळी तिच्यावर सडकून टीका झाली होती.विशेष म्हणजे त्यावेळी कंडोमची जाहिरात करणारी ती पहिली अभिनेत्री होती. अशाप्रकारची जाहिरात करण्यासाठी कोणतीच अभिनेत्री तयार नव्हती त्यावेळी पूजाने ही जाहिरात करण्याचे धाडस दाखवले होते.

कंडोमला आकर्षक बनवण्याचा निर्णय घेतला

90 च्या दशकाच्या सुरुवातीला कंडोमची वेगवेगळी प्रकारे विक्री होत नव्हती, फक्त सरकारी ब्रँड ‘निरोध’ बाजारात उपलब्ध होता.प्रसिद्ध जाहिरात तज्ज्ञ अलीक पदमसी यांच्या नेतृत्वाखाली पहिली कंडोम जाहिरात तयार करण्यात आली होती. ही जाहिरात ‘कामसूत्र’ कंडोमची होती, ज्यात प्रथमच कंडोमला केवळ कुटुंब नियोजनासाठी नव्हे, तर आनंदाच्या दृष्टीकोनातूनही सादर करण्यात आले.रेमंड कंपनीचे गौतम सिंघानिया यांनी कोरियन कंपनीसोबत मिळून ‘कामसूत्र’ कंडोम विकसित केला होता.अलीक पदमसींच्या मते, त्याकाळी पुरुष कंडोमला केवळ गर्भनिरोधक साधन म्हणून पाहत होते, त्यामुळे त्याचा वापर टाळण्याची प्रवृत्ती होती.लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी पदमसींनी कंडोमला आकर्षक बनवण्याचा निर्णय घेतला आणि ‘कामसूत्र’ या ब्रँडच्या अंतर्गत डॉटेड, फ्लेवर्ड आणि अल्ट्रा-थिन प्रकार बाजारात आणले.


पूजाच्या या जाहिरातीनंतर कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाली

या नव्या दृष्टिकोनामुळे कंडोम हा फक्त सुरक्षिततेसाठी वापरण्यात येणारा उत्पादन न राहता लाइफस्टाईलचा एक भाग बनला, तसेच या जाहिरातीनंतर कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाली आणि लोकांनी ते अधिक स्वीकारू लागले.या जाहिरातीत पूजा बेदी आंघोळ करताना दिसली होती, ज्यामुळे ती चर्चेचा विषय बनली होती.पूजा बेदी यांनी सांगितले होते की, ‘कामसूत्र’ कंडोम केवळ सुरक्षिततेसाठी नव्हे, तर महिलांच्या आनंदाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरला.या जाहिरातीने कोणतीही अश्लीलता न दाखवता लोकांच्या मानसिकतेत बदल घडवला आणि कंडोमबाबत समाज अधिक खुलेपणाने बोलू लागला. मात्र 90 च्या दशकात कंडोमची जाहिरातीने अभिनेत्री पूजा बेदी तुफान चर्चेत आली होती.