AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रडत मारली मिठी अन् शोमध्येच लिपलॉक..; हृतिकच्या पूर्व पत्नीचा व्हिडीओ व्हायरल

'अलायन्स' या शोमध्ये सुझान आणि अर्सलान गोणी यांची भावनिक भेट झाली. या दोघांनी एकमेकांबद्दलचं प्रेम या शोमध्ये जाहीररित्या व्यक्त केलं. सुझानला पाहताच अर्सलान भावूक झाला आणि तिला मिठी मारली.

रडत मारली मिठी अन् शोमध्येच लिपलॉक..; हृतिकच्या पूर्व पत्नीचा व्हिडीओ व्हायरल
हृतिक रोशन, सुझान खान-अर्सलान गोणीImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 29, 2026 | 9:48 AM
Share

‘अलायन्स’ हा रिअॅलिटी शो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये गेल्या काही दिवसांपासून अर्सलान गोणीचं वर्चस्व पहायला मिळतंय. अभिनेता कुशल टंडनसोबत तो या शोमध्ये आला होता. मात्र खेळ बदलल्यामुळे आता त्यांची मैत्रीही बदलली आहे. आता दोघं एकत्र नाहीत, तर ते स्वतंत्रपणे खेळत आहेत. हा शो ग्रँड फिनालेकडे वाटचाल करतोय आणि त्यापूर्वी त्यात विविध ट्विस्ट्स पहायला मिळत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये अभिनेता हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझान खान या शोमध्ये पोहोचली. हृतिकला घटस्फोट दिल्यानंतर सुझान अर्सलानला डेट करत आहे. त्यामुळे शोमध्ये ती त्याला भेटायला आली होती.

स्पर्धकांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय या एपिसोडमध्ये पोहोचले होते. यावेळी अर्सलानची गर्लफ्रेंड सुझान खानसुद्धा त्याला भेटायला आली. या एपिसोडचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत दोघं अत्यंत भावूक होऊन एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. अर्सलानला पाहताच सुझान रडू लागते. ती थेट जाऊन तिच्या प्रियकराला मिठी मारते. त्यानंतर दोघं लिपलॉक करतात. बऱ्याच काळाने सुझानला पाहून अर्सलानसुद्धा भावूक होतो. त्यालाही अश्रू अनावर होतात. तेव्हा सुझान त्याचे अश्रू पुसताना दिसते.

पहा व्हिडीओ-

आतापर्यंत चाहत्यांनी सुझान आणि अर्सलान यांना फक्त इन्स्टाग्राम रील्स आणि फोटोंमध्येच एकत्र पाहिलं होतं. ‘अलायन्स’च्या निमित्ताने ते पहिल्यांदाच अशा पद्धतीने शोमध्ये एकत्र दिसले आहेत. सुझान आणि अर्सलान गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. सुझानने 2000 मध्ये हृतिक रोशनशी लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 14 वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांना दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतरही हृतिक आणि सुझान यांच्यात मैत्रीपूर्ण नातं आहे. तर हृतिकच्याही आयुष्यात अभिनेत्री सबा आझादच्या रुपात प्रेम परतलंय. अर्सलान-सुझान आणि हृतिक-सबा हे चौघंही एकमेकांसोबत पार्ट्या करताना, फिरताना दिसतात. इतकंच नव्हे तर हृतिक आणि सबाच्या फोटोंवर सुझान प्रेमाने कमेंट्स करतानाही दिसते. या चौघांच्या मैत्रीला नेटकऱ्यांनी अनेकदा ट्रोल केलं.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच