AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हृतिक रोशन याचा सबा आझाद हिच्यावर प्रेमाचा वर्षाव, एक्स पत्नी सुझान खान हिने थेट…

हृतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. हृतिक रोशन याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. हृतिक रोशन हा सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे चांगलाच चर्चेत आहे. सबा आझाद हिला हृतिक डेट करतोय.

हृतिक रोशन याचा सबा आझाद हिच्यावर प्रेमाचा वर्षाव, एक्स पत्नी सुझान खान हिने थेट...
| Updated on: Nov 01, 2023 | 3:04 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता ऋतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे. ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय. ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे नेहमीच एकमेकांचे फोटो शेअर करताना दिसतात. आज सबा आझाद हिचा 38 वा वाढदिवस आहे. ऋतिक रोशन याने सबा आझाद हिच्यासाठी एक अत्यंत खास अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये.

विशेष म्हणजे ऋतिक रोशन याने शेअर केलेल्या या पोस्टवर त्याची एक्स पत्नी सुझान खान हिने देखील कमेंट केलीये. ऋतिक रोशन याने पोस्टमध्ये लिहिले की, सर्वजण अशी एक जागा नेहमीच शोधत असतात, जिथे आपल्याला आराम मिळेल. असे एक रिलेशन जिथे आपल्याला सुरक्षित वाटते, अशा जोडीदाराला आपण आयुष्यभर मोकळेपणाने सांगू शकतो.

आम्ही रोमांचसाठी तयार आहोत. पुढे ऋतिक रोशन म्हणाला की, तू माझे घर आहेस, जिथे रोमांच सुरू होतो. जीवन जगताना एक जादुई अनुभूती येते आणि हे सर्व मी तुझ्याकडून शिकलो आहे. तू जशी आहेस तशी राहण्यासाठी धन्यवाद. चल एका रोमांचवर जाऊया. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माय लव्ह…

या पोस्टसोबतच ऋतिक रोशन याने एक अत्यंत खास असा फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केलाय. ऋतिक रोशन याने शेअर केलेली ही पोस्ट लोकांना चांगलाच आवडताना दिसत आहे. लोक ऋतिक रोशन याने शेअर केलेल्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. ही पोस्ट व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे एकमेकांना डेट करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे विदेशात धमाल करताना दिसले. ऋतिक रोशन याने विदेशातील एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ऋतिक रोशन आणि सबा आझाद हे एका कॅफेमध्ये बसल्याचे स्पष्टपणे दिसत होते.

Follow Us
मनोज जरांगेंना तीन दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
मनोज जरांगेंना डिस्चार्ज: मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटीत २९ ऑगस्ट उपोषणाची तयारी
नाशिक TCS प्रकरणातील संशयित आरोपी मतीन पटेलला जामीन
नाशिक TCS प्रकरणातील मतीन पटेलला जामीन मंजूर
58 लाख नोंदींच्या प्रमाणपत्रांची मागणी;मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला थेट इशारा: ५८ लाख नोंदींची प्रमाणपत्रे हवीत, वेळ आल्यास सरकार पाडू
भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
बदलापूर वृक्ष प्राधिकरण नियुक्तीवरून भाजप-राष्ट्रवादीत राजकीय संघर्ष
देवेंद्र फडणवीसांची धर्मेंद्र प्रधान यांच्याशी भेट; म्हणाले,‘माझे बंधू
फडणवीस-प्रधान भेट: माझे बंधू म्हणत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
बदलापुरात सीलबंद पाण्याच्या नावाखाली दूषित पाण्याची विक्री?
बदलापूरमध्ये सीलबंद पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाण्याची विक्री
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळला; कंत्राटदारांवर 12 कोटींचा दंड
मीरा-भाईंदरमध्ये मेट्रो स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरेंची कठोर कारवाईची मागणी
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या'...
शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका? सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' निर्णयाने... फुटीर 6 खासदारांबाबत नवी अपडेट समोर
नवनाथ वाघमारेंचं वादग्रस्त वक्तव्य, नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा निषेध, मराठा नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या...
एकीकडे NDA सोबतच्या चर्चा फेटाळल्या, दुसरीकडे शरद पवार थेट भाजपच्या बड्या नेत्यासह एकाच मंचवर, त्या व्हिडीओची तुफान चर्चा