
दिवंगत उद्योजक संजय कपूर यांचे अचानक निधन झाले आणि त्यांच्या कुटुंबातील कलह पुढे आला. थेट प्रकरण कोर्टात पोहोचले आहे. संजय कपूर यांच्या 30 हजार कोटींच्या संपत्तीवरून मोठा वाद सुरू आहे. संजय कपूरची तिसरी पत्नी प्रिया सचदेव कपूर हिच्यावर गंभीर आरोप संजय कपूरच्या मृत्यूपत्राची छेडछाड केल्याचा आहे. हे प्रकरण थेट कोर्टात आहे. संजय कपूरची 30 हजार कोटींची संपत्ती हडपण्याचा प्रियाचा डाव आहे. संपत्तीचा वाद कोर्टात पोहोचला आहे. अशात अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर याची मुलगी समायरा आणि मुलगा कियान यांनीही कोर्टात अर्ज केला. संपत्तीतील अधिकारासाठी कोर्टात त्यांनी धाव घेतली. ज्यानंतर संजय कपूर याची विधवा पत्नी प्रिया हिने करिश्मावरच आरोप केली आहेत.
संजय कपूरच्या आईने देखील प्रियावर गंभीर आरोप केली. आता नुकताच एक धक्कादायक बाब पुढे आली असून करिश्मा कपूर हिच्या दोन्ही मुलांची दोन महिन्यांची फीस भरण्यात आली नाहीये. करिश्मा कपूरच्या मुलांचे कोर्टात म्हणणे मांडणारे वकील महेश जेठमलानी यांनी कोर्टात आरोप करत म्हटले की, करिश्मा कूपर आणि संजय कपूरची मुलगी अमेरिकेत शिक्षण घेते.
मागच्या दोन महिन्यांपासून तिची फीस भरण्यात आली नाही. संजय आणि करिश्मा कपूर यांच्या घटस्फोटावेळी संजय कपूरने मुलांचा खर्च आणि शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली होती. मालमत्ता प्रियाकडे गेल्यानंतर मुलांची फीस भरण्याची जबाबदारी तिची आहे. यावर प्रिया कपूरचे कोर्टात मांडणाऱ्या वकिलांनी म्हटले की, मुलांचा सर्व खर्च प्रिया कपूर याच उचलत आहेत.
फीस न भरल्याचा दावा खोटा आहे. यानंतर न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी मुलांच्या फिसच्या वादावरून चांगलेच फटकारले. दोन्ही पक्षांना त्यांनी सक्त ताकीद देत म्हटले की, हे तुमचे वैयक्तीक मुद्दे कोर्टात घेऊन येऊ नका. ही सुनावणी नाटकीय होऊ नये, म्हणत त्यांनी चांगलेच फटकारले. करिश्मा कपूरच्या मुलांची फीस आणि जबाबदारी कोर्टाने प्रिया कपूरच्या वकिलांकडे दिली असून ते व्हायला पाहिजे, असेही कोर्टाने म्हटले.