AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

झुडपांच्या मागे कपडे बदलले, बाथरुममध्ये…, करिश्मा कपूर हिचा अनेक वर्षांनंतर मोठा खुलासा

Karisma Kapoor: झगमगत्या विश्वात करिश्मा कपूरने पाहिलाय असा काळ जेव्पा अभिनेत्रींनी झुडपांमागे कपडे बदलेल आणि बाथरुमसाठी गेल्यावर..., करिश्मा कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

झुडपांच्या मागे कपडे बदलले, बाथरुममध्ये..., करिश्मा कपूर हिचा अनेक वर्षांनंतर मोठा खुलासा
फाईल फोटो
| Updated on: Aug 24, 2025 | 3:11 PM
Share

अभिनेत्री करिश्मा कपूर अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. एक काळ असा होता, जेव्हा बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर करिश्मा हिने राज्य केलं… पण अभिनेत्रीसाठी हा प्रवास फार कठीण होता. कारण आताच्या कलाकारांसाठी अनेक सुविधा आहेत. पण पूर्वी असं काहीही नव्हतं. 1990 च्या दशकात कलाकारांना शुटिंगच्या दिवसांत अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तेव्हा आराम करण्यासाठी खोली तर नव्हतीच पण कपडे बदलण्यासाठी देखील जागा नव्हती.. शिवाय स्वच्छ बाथरुम देखील नव्हते… वॉशरूमला जाण्यासाठी सेलिब्रिटींना दूर चालत जावं लागत होतं…

करिश्मा कपूर हिने वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं… एका इव्हेंटमध्ये अभिनेत्री म्हणाली, ‘गेल्या 32 वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. मी एक असा काळ पाहिला आहे, ज्यावर तुम्ही विश्वास देखील ठेवणार नाही… आम्ही झुडपांच्या मागे कपडे बदलले आहेत. जर कोणाला बाथरुमला जायचं असेल तर, दूर चालत जावं लागत होतं… तेव्हा पूर्ण युनिटमध्ये मॅडम टॉयलेटला जात आहे… अशी चर्चा व्हायची… मी तो काळ पाहिला आहे.’

करिश्मा कपूरने पुढे सांगितलं, शूटिंग दरम्यान कलाकारांना स्वतः संसाधनांची व्यवस्था कशी करावी लागली, ‘आम्ही कायम रस्त्याच्या किनारी असलेल्या दुकानांमध्ये थांबायचो… तर अनेकांना आम्ही तुमच्या घराच कपडे बदलू का आमची शुटिंग सुरु आहे? असं विचारायचो. आज इंडस्ट्रीत अनेक मोठे बदल झाले आहेत. ते बदल पाहिल्यानंतर विश्वास देखील बसत नाही…’

करिश्मा कपूर पुढे म्हणाली, ‘आम्ही असे सिनेमे बनवायचो ज्यात आम्ही फक्त डबिंग करायचो. त्याआधी आम्ही कधीही फुटेज पाहिले नव्हते. सिनेमा पडद्यावर प्रदर्शित झाल्यावरच आम्हाला त्याचा परिणाम दिसायचा..’ असं देखील करिश्मा म्हणाली..

आता करिश्मा बॉलिवूडपासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करिश्माच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

करिश्मा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते. नुकताच अभिनेत्रीचा पूर्व पती आणि उद्योजक संजय कपूर यांचं निधन झालं. संजय आणि करिश्मा यांचं नातं लग्नानंतर फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आज करिश्मा सिंगर मदर म्हणून दोन मुलांचा सांभाळ करत आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.