सुझान – हृतिक यांच्या घटस्फोटावर भावाने सोडलं मौन; म्हणाला, आजही पश्चाताप होतो कारण…
Sussanne Khan - Hrithik Roshan Divorce: सुझान - हृतिक यांचा घटस्फोट, बहिणीचा संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर भाऊ म्हणाला, 'आजही पश्चाताप होतो कारण...', दोघांच्या घटस्फोटाची कायम सुरु असते चर्चा...

Sussanne Khan – Hrithik Roshan Divorce: अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्या घटस्फोटाला आज अनेक वर्ष झाली आहे. घटस्फोटानंतर दोघे त्यांच्या आयुष्यात पुढे देखील देले आहेत. पण हृतिक आणि सुझान मुलांचा एकत्र सांभाळ करत आहेत. दरम्यान सुझान हिचा भाऊ आणि अभिनेता जायेद खान याने बहिणीच्या खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र जायेद खान याने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
जायेद म्हणाला की, 12 वर्षांचा होते, तेव्हापासून हृतिकला ओळखत आहे. तेव्हा सुझान आणि हृतिक यांची ओळख देखील झाली नव्हती… दोघांचं प्रेम आणि घटस्फोटावर जायेद म्हणाला, ‘माझं कुटुंब कायम प्रेमाच्या बाजूने उभं राहिलं आहे. माझ्या मुलीने जी निवड केली आहे, ती योग्य आहे… असं म्हणत कुटुंबाने सुझानची साथ दिली…’
‘दुसरं कोणी असतं तर, मला नाही वाटत त्यांनी समजून घेतलं असतं… ती स्वतःच्या मर्जीची मालीक आहे आणि मला आनंद आहे की, तिच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाली आहे… हिच गोष्ट माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे…’ असं देखील जायेद म्हणाला.
जायेदला कोणत्या गोष्टीचा होतोय पश्चाताप…
हृतिक आणि जायेद यांचा आज कोणताच संबंध नाही. पण वर्षांपूर्वी करण जोहर याच्या शोमध्ये जायेद याने अभिनेता शाहरुख खान याची निवड केली, ज्याचा पश्चाताप त्याला आजही होत आहे. जायेद म्हणाला, ‘मला आठवत आहे एकदा ‘कॉफी विथ करण’मध्ये करण याने मला विचारलं होतं हृतिक की शाहरुख… तेव्हा मी शाहरुख याचं नावं घेतलं होतं…’
‘कारण तेव्हा मी शाहरुख याच्यासोबत काम करत होतो. शो संपल्यानंतर घरी आलो तेव्हा सुझानकडे माझ्याकडे नाराज झालेल्या नजरेनं पाहिलं. तेव्हा दोघांचं लग्न झालेलं होतं. हृतिक एक समजदार व्यक्ती आहे, त्याने कधीही मला अडवलं नाही.’ असं देखील जायेद म्हणाला.
ऋतिक रोशन आणि सुझान खान यांचा घटस्फोट…
20 डिसेंबर 2000 रोजी बंगळुरूमध्ये लग्न करण्यापूर्वी हृतिक आणि सुझान एकमेकांना डेट करत होते. त्यांची मुले, रिहान आणि रिदान यांचा जन्म 2006 आणि 2008 मध्ये झाला. हृतिक आणि सुझान डिसेंबर 2013 मध्ये वेगळे झाले आणि नोव्हेंबर 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
