
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे त्यांच्या चित्रपटांबद्दल जितके समर्पित आहेत त्यांना त्यांच्या गाण्यांबद्दलही तितकंच प्रेम आहे. 83 व्या वर्षीही अथक मेहनत करून काम करणाऱ्या बिग बी यांनी अनेक ब्लॉकबस्टर तर कधी फ्लॉप चित्रपटही दिले आहेत. ज्या वयात बहुतेक लोक फक्त विश्रांती घेतात, त्या वयात बिग बी हे आजच्या तरुण स्टार्सनाही कडी टक्कर देता. गेल्या सहा दशकांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असलेले बिग बी यांच्याकडे सिनेमाशी संबंधित अनेक कथा आहेत, ज्या ते अनेकदा सांगतात. खूप शांत आणि गंभीर दिसणारे अमिताभ बच्चन यांनी एकदा शंकर महादेवन यांना धमकी दिली होती यावर तुम्हाला विश्वास बसेल का?
शंकर महादेवनला बिग बी धमकी देतात तेव्हा..
हो हे खरं आहे. खरंतर हा किस्सा बिग बी यांच्या ‘कजरा रे’ या ऑयकॉनिक गाण्यावेळचा आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत. पण “बंटी और बबली” चित्रपटातील “कजरा रे” हे सुपरहिट गाणे आजही चाहत्यांच्या हृदयात कोरले गेले आहे. 20 वर्षानंतरही हे गाणं अनेकदा पार्ट्यांमध्ये वाजत असतं. तेव्हा अमिताभ यांनी दिलेली धमकी शंकर महादेवन यांना अजूनही लक्षात आहे
अलिकडेच, ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ च्या ‘ऑल इंडिया मेहफिल’ पॉडकास्टमध्ये, त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या धमकीबद्दल सांगितलं होतं. शंकर महादेवन म्हणाले, “मी अमिताभ सरांना ‘कजरा रे’ चा एक भाग डब करायला सांगितले होते. त्यांनी विचारले, ‘कोणतं गाणं?'” मी जेव्हा नावं सांगितलं, तेव्हा ते म्हणाले ‘मी ते आधीच शूट केले आहे. जर तू त्याला (गाण्याला) हातही लावलास तर मी तुझं करिअर उद्ध्वस्त करेन.’ त्यांचं हे बोलणं ऐकून सर्वांना धक्का बसला पण बिग बी मात्र जोरात हसायला लागले. शंकर महादेवन हसले आणि म्हणाले, “सरांना माझा रफ व्हर्जन इतका आवडलं की त्यांना तो बदलायचा नव्हता. आणि गाणं फायनल झालं.” असा किस्सा त्यांनी सांगितलं.
त्यानतर त्यांनी आणखी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले ‘कभी अलविदा ना कहना’ मधील गाणं होतं ‘रॉक एन रोल सोनिये’. जेव्हा मी शूटिंग सेटवर पोहोचले तेव्हा बिग बींनी त्याला आनंदाने मिठीत मारली. ते म्हणाले “किती सुंदर गाणं बनवले आहेस…”. “सर खूप गोड आहेत, ते नेहमीच मला प्रोत्साहन देतात.” असंही शकर यांनी नमूद केलं.
“बंटी और बबली” मधील “कजरा रे” मध्ये गुलजार यांनी गीतलेखन केलं असून शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत आहे. ऐश्वर्या राय बच्चन, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्यावर शूट झालेल्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन वैभवी मर्चंटने केले होते. हे गाणे कव्वाली आणि कजरी शैलीचे उत्तम संयोजन असल्याचे सिद्ध झाले, आजही हे गाणं खूप लोकप्रिय असून पार्टीमध्ये हमखास वाजतचं.