AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Aishwarya | “तिच्यावर हात उचलला असता तर..”; ऐश्वर्याच्या आरोपांवर सलमान स्पष्टच बोलला

1998 मध्ये 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र 2002 मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला.

Salman Aishwarya | तिच्यावर हात उचलला असता तर..; ऐश्वर्याच्या आरोपांवर सलमान स्पष्टच बोलला
Aishwarya Rai and Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 07, 2023 | 2:52 PM
Share

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा काही जोड्या होत्या, ज्यांच्या अफेअरपेक्षा अधिक त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा चघळल्या गेल्या. अनेक वर्षांनंतरही या जोड्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. अशीच एक जोडी म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय बच्चन. इंडस्ट्रीतील जवळपास 35 वर्षांच्या कारकिर्दीत सलमानचं बऱ्याच अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलंय. मात्र 1990 आणि 2000 दरम्यान त्याचं रिलेशनशिप सर्वाधिक चर्चेत होतं. अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबतचं त्याचं नातं त्यावेळी जगजाहीर होतं. मात्र ब्रेकअपनंतर ऐश्वर्याने सलमानवर काही गंभीर आरोप केले होते. सलमानने मारहाण केल्याचा दावा ऐश्वर्याने केला होता. आता बऱ्याच वर्षांनंतर सलमानचा एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या व्हिडीओत तो ऐश्वर्याच्या आरोपांविषयी बोलताना दिसत आहे.

2002 मध्ये बॉम्बे टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत ऐश्वर्या सलमानसोबतच्या ब्रेकअपविषयी मोकळेपणे व्यक्त झाली होती. दारुच्या नशेत सलमानने हात उचलल्याचा दावा तिने केला होता. “मी त्याच्या वाईट काळात दारुच्या नशेतील गैरवर्तनाला सहन करत त्याच्या पाठिशी उभी राहिले. त्याबदल्यात मला त्याच्या गैरवर्तणुकीचा (शाब्दिक, शारीरिक आणि भावनिक), अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला. म्हणून इतर कोणत्याही स्वाभिमानी महिलांप्रमाणे मीसुद्धा त्याच्यासोबतचं नातं संपुष्टात आणलं”, असं ऐश्वर्या म्हणाली होती.

पहा व्हिडीओ-

If I hit a woman, she wouldn’t have survived. -Savlon Bhai by u/Master-Machine-8700 in BollyBlindsNGossip

एनडीटीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीत सलमानला या आरोपांबद्दल प्रतिक्रिया देण्यास विचारण्यात आलं होतं. यावेळी ऐश्वर्याचा थेट उल्लेख केला नव्हता, मात्र तिच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्याला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सलमान म्हणाला, “आता जर महिलेनं असं म्हटलं असेल की मी हात उचलला होता, तर मी अजून काय बोलावं?” जेव्हा पत्रकाराने विचारलं की “तुला त्या विषयाच्या खोलात जायचं नाहीये का?” तेव्हा सलमानने उत्तर दिलं, “एका पत्रकाराने मला खूप आधी याबद्दल विचारलं होतं. तेव्हा मी टेबलवर माझा हात जोरात आपटला होता. तो टेबल तुटला की काय हे तो घाबरलेला पत्रकार पाहत होता. आता जर मी कोणाला मारलं असेल तर साहजिकच ते भांडणात असेल. मी तेव्हा प्रचंड रागात असेन. रागाच्या भरात जर मी माझा तिच्यावर उचलला तर मला वाटत नाही की ती जिवंत राहील. त्यामुळे आरोपांमध्ये काही तथ्य नाही.”

1998 मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या राय एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र 2002 मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.