TV9 Exclusive : विरुष्का आणि पापाराझींमध्ये महत्त्वाची डील, विरुष्काकडून लेकीची प्रायव्हसी जपण्याचा प्रयत्न

अनुष्का आणि विराट आपल्या मुलीसाठी प्रचंड प्रोटेक्टिव्ह दिसत आहेत. (Important deal between Virushka and paparazzi, Virushka tries to protect daughter’s privacy)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:14 PM, 14 Jan 2021

मुंबई : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली आई-वडील झाले आहेत. 11 जानेवारीला अनुष्का शर्मानं एका मुलीला जन्म दिलाय. गेले अनेक दिवस अनुष्काच्या प्रेग्नेंसीची चर्चा होती, दोघांचेही चाहते विरुष्काच्या बाळाची आतुरतेनं वाट पाहत होते. मात्र अशा परिस्थितीत अनुष्का आणि विराट आपल्या मुलीसाठी प्रचंड प्रोटेक्टिव्ह दिसत आहेत. त्यांनी आपल्या मुलीला पापाराझीपासून लांब ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एवढंच नाही तर यासाठी त्यांनी पापाराजींना आपल्या मुलीपासून लांब रहाण्याचं आवाहन देखिल केलं आहे.

सुरुवातीला सोशल मीडिया आणि नंतर फोटोग्राफर्सला भेट देत विराट आणि अनुष्कानं आवाहन केलं आहे की कृपया आमच्या मुलीपासून लांब राहा. आता टीव्ही 9 ला मिळालेल्या माहितीनुसार फॉटोग्राफर्सनी विराट-अनुष्काची ही विनंती मान्य केली आहे. त्यांनी विराट-अनुष्काच्या मुलीपासून लांब राहणार असल्याचं सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

खरं तर यापूर्वी अनुष्का आणि विराटनं फोटोग्राफरना भेटवस्तू देऊन संदेश पाठवला सोबतच गोपनीयतेचा आदर करत मुलीपासून दूर राहावं अशी विनंती विराट आणि अनुष्कानं केली . याचा एक व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहे. या संदेशात असं लिहिलंय की, ‘आम्हाला आमच्या मुलीच्या प्रायव्हसीचं रक्षण करायचं आहे आणि यासाठी आम्हाला तुमच्या समर्थनाची गरज आहे.

आम्ही नेहमीच लक्षात ठेवतो की तुम्हाला तुमचा कंटेंट मिळावा, मात्र आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही असा कुठलाही कंटेंट शेअर करू नये जो आमच्या मुलीशी निगडीत असेल. ‘टीव्ही 9 ला मिळालेल्या माहितीनुसार या सगळ्या फोटोग्राफर्सनी अनुष्का-विराटची ही विनंती मान्य केली आहे.

काही दिवसांपूर्वी अनुष्कानं व्होग मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, दोघंही आपल्या बाळाला माध्यमांपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतील. त्यांचं मूल खोडकर होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. अनुष्कानं सांगितलं होतं की तिनं आणि विराटनं बाळाला सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही याबद्दल खूप विचार केला. आम्हाला आमच्या बाळाला सोशल मीडियाच्या या जगात अडकवायचं नाहीये. ते बाळ मोठं झाल्यानंतर तो त्याचा निर्णय घेईल. हे जरा कठीण आहे मात्र आम्हाला हे करायचंय.

संबंधित बातम्या 

‘मुलीचा फोटो छापू नका’, विरुष्काचं मीडियाला निवेदन