AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थकवा आणि ताप, बॉलिवूडचा ‘सीरियल किसर’ इमरान हाश्मी पडला आजारी; काही दिवसांसाठी शुटींग थांबवली

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी हा आजारी पडला आहे. "ओजी" या तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला तीव्र ताप आणि थकवा जाणवू लागला असता तपासणी केल्यास या आजाराची लक्षणे आढळून आली. आता शूटिंग काही काळासाठी थांबवण्यात आलं आहे.

थकवा आणि ताप, बॉलिवूडचा 'सीरियल किसर' इमरान हाश्मी पडला आजारी; काही दिवसांसाठी शुटींग थांबवली
emraan hashmiImage Credit source: instagram
| Updated on: May 31, 2025 | 3:22 PM
Share

बॉलिवूडचा ‘सीरियल किसर’ अभिनेता इमरान हाश्मी सध्या चर्चेत आहे. कारण एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान तो आजारी पडला आहे. इमरान यांनी पवन कल्याणसोबत ‘ओजी’ या तेलुगू चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे.

इमरान हाश्मी आजारी 

शुटींगदरम्यान त्याला थकवा जाणवू लागला आणि त्याला ताप आला अशी लक्षणे जाणवू लागली होती. त्यानंतर त्याने तपासणी केली असता त्याला डेंग्यू झाल्याचं निदान झालं आहे. आता चित्रपटाचे चित्रीकरण काही काळासाठी थांबवण्यात आलं असून इम्रान लवकर बरा व्हावा म्हणून तो विश्रांती घेत आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

भारतात मान्सून लवकर आला आहे. अशा वेळी, लोकांना डेंग्यूबद्दल सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, म्हणूनच, त्याची लक्षणे ओळखणे आणि ते टाळण्याचे मार्ग जाणून घेणे महत्वाचे आहे जेणेकरून आपण या आजारावर मात करू शकतो.

डेंग्यू म्हणजे काय? डेंग्यू हा विषाणूमुळे पसरणारा आजार आहे, जो डासांच्या चावण्यामुळे होतो. हा आजार डेंग्यू विषाणूमुळे (DENV) होतो, ज्याचे DENV-1 ते DENV-4 असे चार प्रकार आहेत. डेंग्यू पसरवणारा डास एडिस इजिप्ती आहे, जो सहसा दिवसा चावतो.

डेंग्यूची लक्षणे काय? डास चावल्यानंतर साधारणपणे 4 ते 10 दिवसांनी डेंग्यूची लक्षणे दिसू लागतात. ही लक्षणे सौम्य किंवा गंभीर असू शकतात आणि आजार अनेकदा 2 ते 7 दिवस टिकतो.

डेंग्यूच्या लक्षणांमध्ये खूप जास्त ताप (104°F किंवा 40°C पर्यंत), तीव्र डोकेदुखी, डोळ्यांमागे वेदना, तीव्र स्नायू आणि सांधेदुखी, उलट्या, शरीरावर लाल पुरळ (ताप आल्यानंतर 2 ते 5 दिवसांनी), प्रचंड थकवा जाणतो, मान किंवा शरीरावर सूज येणे. जर तुम्हाला अशी कोणतीही लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण वेळेवर उपचार न केल्यास डेंग्यू धोकादायक ठरू शकतो.

पावसाळ्यात डेंग्यूपासून बचाव कसा करावा

पावसाळ्यात डेंग्यू पसरवणारे डास खूप सक्रिय होतात. पण काही सोप्या उपायांचा अवलंब करून आपण सुरक्षित राहू शकता.

साचलेले पाणी काढून टाका: बादल्या, भांडी, कूलर, जुने टायर इत्यादी ठिकाणी पाणी साचू देऊ नका. अशा पाण्यात डास अंडी घालतात.

मच्छरदाणी वापरा: खिडक्या आणि दारांवर मच्छरदाणी किंवा जाळी लावा, जेणेकरून डास घरात प्रवेश करणार नाहीत.

संपूर्ण शरीर झाका: सकाळी आणि संध्याकाळी पूर्ण बाह्यांचे शर्ट आणि लांब पँट घाला. या काळात डास सर्वात जास्त चावतात.

दररोज पाणी बदला: फुलांच्या कुंड्यांमध्ये, पक्ष्यांना खायला घालणाऱ्या भांड्यांमध्ये किंवा पाळीव प्राण्यांच्या पाण्याच्या कुंड्यांमध्ये दर दुसऱ्या दिवशी पाणी बदला.

मासे ठेवा: जर तुमच्या घरात सजावटीचे तळे असेल तर त्यात गप्पीसारखे मासे ठेवा जे डासांच्या अळ्या खातात.

स्वच्छता ठेवा: पाऊस पडल्यानंतर परिसर स्वच्छ ठेवा, कारण एडीस डास फक्त स्वच्छ आणि साचलेल्या पाण्यातच पैदास करतात.

डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.