AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Imran Khan: अवंतिकाला घटस्फोट का दिला? इमरान खानने पहिल्यांदाच सांगितलेलं कारण

Imran Khan: एकेकाळी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असलेल्या इमरानने आता आपल्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण काळाबद्दल स्पष्टपणे बोलण्यास सुरुवात केली होती.

Imran Khan: अवंतिकाला घटस्फोट का दिला? इमरान खानने पहिल्यांदाच सांगितलेलं कारण
Imran Khan and AvantikaImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 15, 2026 | 11:36 AM
Share

Imran Khan: अभिनेता इमरान खान याने आपल्या अभिनयाने एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. ‘जाने तू… या जाने ना’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या इमरानच्या वैयक्तिक आयुष्याचीही अनेकदा चर्चा झाली. त्याची पत्नी अवंतिका मलिक हिच्यासोबतचं नातं तुटल्यानंतर चाहत्यांना त्यांच्या विभक्त होण्यामागचं नेमकं कारण जाणून घ्यायचं होतं. एका मुलाखतीत इमरान याबाबत मोकळेपणाने भाष्य केलं होतं. स्वतःच्या मनातील संघर्ष आणि भावनिक ओझ्याचा परिणाम वैवाहिक नात्यावर झाल्याचं त्याने सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी झाल्याने इमरानला मुंबई पोलिसांनी देश सोडून जाण्याची नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर आता इमरानचं वैयक्तिक आयुष्यही चर्चेत आलं आहे.

इमरान खानने मे 2024 मध्ये ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत अवंतिकासोबतच्या विभक्त होण्याबाबत त्याची बाजू मांडली होती. या विषयावर अधिक बोलून चर्चांना खतपाणी घालण्याची इच्छा नसल्याचं त्याने स्पष्ट केलं होतं. मात्र, त्या काळात तो स्वतःच्या आयुष्यातील अनेक अडचणी आणि अंतर्गत संघर्षांचा सामना करत होता, असं त्याने सांगितलं. इमरानच्या म्हणण्यानुसार, तो स्वतःच्या भावनिक ओझ्याशी झगडत असताना त्याच्या वैवाहिक नात्यामुळे या परिस्थितीत सुधारणा होत नव्हती. एका निरोगी नात्यात दोन्ही व्यक्तींनी एकमेकांना अधिक चांगलं, सक्षम आणि आनंदी बनवण्यासाठी मदत करणं अपेक्षित असतं. मात्र, त्यावेळी त्यांचं नातं अशा टप्प्यावर नव्हतं, असं त्याने स्पष्ट केलं.

इमरान खान आणि अवंतिका मलिक यांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. लग्नापूर्वीपासूनच दोघे एकमेकांना ओळखत होते. या जोडप्याला इमारा नावाची मुलगी आहे. मात्र, 2019 च्या आसपास त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. सुरुवातीला दोघांनीही या चर्चांवर सार्वजनिकरीत्या फारसं भाष्य केलं नव्हतं. कालांतराने त्यांच्या विभक्त राहण्याच्या बातम्या चर्चेत आल्या. मार्च 2024 मध्ये इमरानने आपण अवंतिकापासून विभक्त झालो असून घटस्फोट घेतल्याचं स्पष्ट केलं.

अवंतिकापासून विभक्त झाल्यानंतर इमरानच्या आयुष्यात लेखा वॉशिंग्टन आली. मार्च 2024 मध्ये इमरानने लेखासोबतच्या नात्याचीही पुष्टी केली होती. मी आणि लेखा दोघंही आधीच्या नात्यांपासून विभक्त झालो होतो, असं त्यावेळी इमरानने स्पष्ट केलं होतं. लेखाला त्यांच्या वैवाहिक नात्यातील दुराव्यासाठी जबाबदार धरणं चुकीचं असल्याचंही त्याने म्हटलं होतं.

Follow Us
देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; राऊतांचं मोठं राजकीय भाकीत
Sanjay Raut : देशात मोठी उलथापालथ होईल, ते दोघे जाणार; संजय राऊतांचं मोठं राजकीय भाकीत, नेमकं काय म्हणाले?
यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
Sanjay Raut on Dasara Melava : यंदाचा दसरा मेळावा कसा असेल, संजय राऊतांनी सांगितलं....
अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश.....
Actor Imran Khan : अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस; २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडण्याचे निर्देश?
सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; कोणत्या गोष्टींवर....
Sunil Tatkare | सुनील तटकरेंनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट; नेमक्या कोणत्या गोष्टींवर झाली चर्चा?
अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला...
Anganwadi Sevika Bhaubeej Gift : अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार; दिवाळीपूर्वी प्रत्येक सेविकेला मिळणार एवढे पैसे
पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी....
Shivsena : पुणे शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाची भाजपला धक्का देणारी खेळी; नेमकं काय घडतंय? 
तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं
Yo Yo Honey Singh : तीन समन्सनंतरही हनी सिंग गैरहजर? महाराष्ट्र सायबर सेलने पुन्हा बजावलं समन्स; पुढे काय होणार?
काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; मंदिर व्यवस्थापनाने....
Kashi Vishwanath Temple : काशी विश्वनाथ मंदिराच्या कळसावरील सोने गायब; वकिलांचा गंभीर आरोप, मंदिर व्यवस्थापनाने काय दिलं उत्तर?
मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
Mumbai FDA : मुंबईच्या धारावीमधील प्रसिद्ध तेरेसा हॉटेलवर FDA ची कारवाई
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....