AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी चित्रपटाची थेट बॉलिवूडला तगडी टक्कर, 7 दिवसांत रचला सर्वात मोठा विक्रम

गोंधळ चित्रपटने भारतीय सिनेमात एक नवा विक्रम रचला आहे. यात तब्बल २५ मिनिटांचा अखंड वन-टेक सीन चित्रित करण्यात आला, जो भारतीय इतिहासातील पहिलाच ठरला. दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या नेतृत्वाखालील टीमने यासाठी प्रचंड मेहनत घेतली.

मराठी चित्रपटाची थेट बॉलिवूडला तगडी टक्कर, 7 दिवसांत रचला सर्वात मोठा विक्रम
Gondhal movie
| Updated on: Nov 18, 2025 | 4:37 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीत नेहमीच नवनवीन प्रयोग होत असतात. पण आता गोंधळ या चित्रपटाने थेट भारतीय चित्रपटसृष्टीत एक नवा आणि भव्य विक्रम स्थापित केला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून प्रशंसा मिळवत आहे. उत्कृष्ट कथानक आणि दमदार अभिनयाच्या जोरावर चर्चेत असलेल्या या चित्रपटात तब्बल २५ मिनिटांचा अखंड वन-टेक (One-Take) सीन चित्रित करण्यात आला आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील हा पहिलाच इतक्या मोठ्या कालावधीचा वन-टेक प्रयोग ठरला आहे.

सात दिवस अथक मेहनत आणि 25 मिनिटांचा भव्य सीन पूर्ण

गोंधळ चित्रपटाचा हा २५ मिनिटांचा हा भव्य सीन परिपूर्ण करण्यासाठी संपूर्ण टीमने सात दिवस अथक मेहनत घेतली. दिग्दर्शक संतोष डावखर यांनी याबद्दलची माहिती दिली. प्रत्येक वायर, प्रत्येक फोकस आणि प्रत्येक कलर तापमानावर आमची कसोटी लागली होती. दररोज ३०० हून अधिक जुनिअर्स, पाऊण किलोमीटरपेक्षा जास्त लाइटिंग सेटअप, पाच जनरेटर आणि पेट्रोलचे तीन टँकर यासाठी लागले.” असे संतोष डावखर म्हणाले. हा सीन एकाच टेकमध्ये सुरळीत पार पडणे म्हणजे एक जादूच होती, असेही ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय स्तरावर वन-टेक शैलीला विशेष महत्त्व आहे. २०१४ मधील ‘बर्डमॅन’ आणि २०१९ मधील ‘१९१७’ यांसारख्या ऑस्कर विजेत्या चित्रपटांनी याच शैलीचा प्रभावीपणे वापर केला आहे. ‘गोंधळ’चा हा प्रयोग त्याच दर्जाच्या धाडसाच्या पावलावर पाऊल टाकणारा आहे. ज्यामुळे मराठी चित्रपटाने तांत्रिक प्रयोगांची नवी मर्यादा गाठली आहे.

संतोष डावखरांचे दिग्दर्शन

गोंधळ हा चित्रपट महाराष्ट्राची परंपरा, मानवी भावनांमधील गुंतागुंत, नात्यांमधील ताणतणाव आणि परिस्थितीच्या रोलर-कोस्टरवर आधारित आहे. नाट्य आणि थरार यांचा अनोखा संगम असलेली ही कथा प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. याची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले आहेत. त्यांनीच चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. डावखर फिल्म्स निर्मित या चित्रपटाच्या सहनिर्मात्या दीक्षा डावखर आहेत.

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानास्पद क्षण

यात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके हे नामवंत कलाकार यात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. गोंधळने केलेला हा प्रयोग केवळ मराठी चित्रपटसृष्टीसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानास्पद क्षण आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.