
बिग बॉसच्या फिनालेला काही दिवस शिल्लक असताना घरात मोठा गोंधळ उडाल्याचे बघायला मिळाले. बिग बॉसच्या घरातील समीकरणे गेल्या काही दिवसांपासून बदलताना दिसत आहेत. शोच्या सुरूवातीच्या दिवसांपासून चांगले मित्र राहिलेले सदस्य एकमेकांच्या शत्रू झाले आहेत. मालती चहर आणि फरहाना भट्ट बिग बॉसच्या घरात चांगले मित्र होते. मात्र, आता दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याचे दिसतंय. हेच नाही तर मालतीचे बोलणे ऐकून फरहाना भट्टला धक्का बसला. क्रिकेटर दीपक चहरच्या बहिणीने बिग बॉसच्या घरात मोठा गोंधळ घातल्याचे बघायला मिळाले. हेच नाही तर मालती चहरचे बोलणे ऐकून घरातील सदस्यांना मोठा धक्का बसला. एकेकाळी चांगले मित्र असलेले आता जोरदार भांडणे करताना दिसले.
बिग बॉसच्या व्हायरल होणाऱ्या प्रोमोमध्ये मालती चहरचे एक वेगळे रूप दिसतंय. मालतीने तिचा मित्र अमाल मलिकला फरहाना भट्टशी अजिबात बोलू नको असे सांगितले. तिला एकटे सोड… तिला अजिबात बोलायचे नाही, असे सांगितले. त्यानंतर अमल मालतीला स्पष्टपणे म्हणाला की, मी कोणत्याही कारणाशिवाय कोणालाही विनाकारक टार्गेट करू शकत नाही. मग काय मालतीने थेट फरहाना भट्टशी पंगा घेतला.
मालती फरहाना भट्टला म्हणाली की, अबे ओय… तुझे तोंड खूप घाण आहे…मालतीचे हे बोलणे ऐकल्यावर फरहाना भट्ट देखील संतापली. ती म्हणाली, ओय काय असते? ओय आपल्या मित्रांना वापरायचे… माझ्यासोबत हे वापरू नको… माझ्यासोबत अजिबातच अशी रस्त्यावरची भाषा करायची नाही. क्रिकेटरच्या बहिणीने काहीही कारण नसताना फरहाना भट्टसोबत पंगा घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे.
हेच नाही तर मालती हिने फरहाना भट्टनंतर आपला मोर्चा मित्र प्रणितकडे वळवते आणि काहीही कारण नसताना ती प्रणितसोबत वाद घालताना दिसली. मालतीच्या वागण्याने प्रणितला देखील मोठा धक्का बसला आणि तो निराश झाला. प्रणित मालतीला म्हणतो की, जर तू तुझ्या मित्रांसोबत गोष्टी व्यवस्थित करू शकत नाहीस तर माझ्यासोब काय करणार आहेस. मालकीचे वागणे पाहून घरातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे.