Bigg Boss 19 मधून बाहेर येताच तान्या मित्तल जाणार तुरुंगात? काय आहे संपूर्ण प्रकरण
Bigg Boss 19 : तान्याने लोकांसोबत आणि एक्स - बॉयफ्रेंडसोबत असं काय केलं, ज्यामुळे तिच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल, 'बिग बॉस' मधून बाहेर येताना तान्या जाणार तुरुंगात. काय आहे संपूर्ण प्रकरण घ्या जाणून...

Bigg Boss 19 : तान्या मित्तल ‘बिग बॉस 19’ मध्ये आल्यापासून चर्चेत आहे. तान्या घरातील तिच्या गेममुळे नाही तर तिच्या श्रीमंतीमुळे चर्चेत आहे. तान्या हिने बिग बॉसच्या घरात असं दावे केले आहेत, ज्यामुळे प्रत्येक जण हैराण आहे. तान्या बिग बॉस सुरु झाल्यापासून तिच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, तान्याच्या एक्स बॉयफ्रेंडपासून ते अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएंसरपर्यंत, सर्वजण तिचं पितळ उघडं करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान, ग्वाल्हेर एसएसपी कार्यालयात तान्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार मुंबईस्थित सोशल मीडिया इन्फ्लुएंसर फैजान अन्सारी याने दाखल केली आहे.
फैजान याने केलेल्या आरोपांनुसार, तान्या हिने अनेकांची पैशांची फसवणूक केली आणि बॉयफ्रेंडला तुरुंगात देखील पाठवलं आहे. शिवाय, बिग बॉसमध्या तान्या हिने कुटुंब आणि स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या आहे. चा फैजान याने तान्याला अटक करा… अशी मागणी देखील केली आहे.
फैजान अन्सारी ग्वाल्हेरमध्ये पोहोचला आणि त्याने तान्या मित्तलवर अनेक आरोप केले. तान्याने बिग बॉसच्या घरात तिच्या संपत्तीबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या आहेत… असं देखील फैजान म्हणाला. एवढंच नाही तर, आता तान्याविरुद्ध न्यायालयात जाणार… असं देखील फैजान म्हणाला आहे.
एक्स बॉयफ्रेंड बलराज सिंहने केली तान्याची पोलखोल…
बलराज सिंह याने सर्वात आधी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत तान्याची पोलखोल केली आणि तिच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या… बलराजने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलेला ज्यामध्ये तान्याला डेट करत असल्याचा दावा त्याने केला. बलराज म्हणाला की तान्या लोकांचा अनादर करते आणि ती स्वतःला जे हवं आहे ती मिळवतेच…
कोण आहे तान्या मित्तल?
तान्या मित्तल ग्लालियर येथील राहणारी एक सोशल मीडिया इनफ्लूएंसर आणि यूट्यूबर आहे. बिग बॉसमध्ये तान्याने तिच्या कुटुंबियांबद्दल सांगितलं होतं. शिक्षण सोडल्यानंतर, तिच्यावर कुटुंबियांकडून लग्नाचा दबाव होता. ज्यामुळे तिने स्वतःला खोलीत बंद केलं होतं. त्यानंतर कुटुंबियांच्या नकळत तिने व्यवसाय सुरु केला… ग्वाल्हेरमध्ये तिचे अनेक कारखाने आणि व्यवसाय आहेत. शिवाय तिच्या घरासमोर पंचतारांकित हॉटेल सुद्धा फिकं आहे… असा दावा देखील तान्याने केला आहे.
