एका पिशवीत आतडी दुसऱ्या पिशवीत कापलेले हात – पाय आणि…, बायकोची हत्या, दिग्दर्शक अटक
पिशवीत सापडला लोकप्रिय अभिनेत्रीचा मृतदेह, एका पिशवीत आतडी दुसऱ्या पिशवीत कापलेले हात - पाय आणि..., सत्य जाणून बसेल धक्का, बायकोची हत्या, दिग्दर्शक अटक

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका सहाय्यक दिग्दर्शकाना पत्नीची हत्या केली आहे. पत्मीची हत्या केल्यानंतर दिग्दर्शकाना मृतदेहाचे तुकडे केले आणि अवयव वेगवेगळ्या पिशवीत भरुन फेकून दिले. याप्रकरणी पोलिलांनी दिग्दर्शकाला अटक केली आहे. दिग्दर्शकाचं नाव बालाकृष्णन असं आहे तर मृत महिलेचं नाव संध्या आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. महिलेचे अवयव सापडले आहेत. पण डोकं अद्याप सापडलेलं नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या हातावर शिव – पार्वती आणि ड्रॅगन यांसारखे टॅटू होते. शिवाय काही दागिने देखील होते. त्याच्यात मदतीने मृतदेह संध्याचं असल्याचं स्पष्ट झालं. पोलीस गेल्या दोन आठवड्यांपासून प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरोपीने गुन्हा कबूल केला आणि पत्नीवर संशय असल्याच्या कारणामुळे हत्या केल्याचं देखील सांगितलं आहे. पोलिसांनी अंदाजे 11 हजार 700 टन कचऱ्याच्या राखेतून अवशेष शोधले. पण तिचं डोकं आणि डावा हात कुठेही सापडला नाही. पोलिसांनी राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये बेपत्ता महिलांच्या तक्रारी तपासल्या.
अशात, एका महिलेने तूतीकोरिन पोलीस स्टेशनमध्ये गेल्या 20 – 25 दिवसांपासून मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. अखेर ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून संध्या होती. संध्या हिच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
संध्या पती आणि दोन मुलांसोबत चेन्नईच्या जाफरखानपेट भागात राहत होती. तिच्या पतीचं नाव बालकृष्णन आहे. जेव्हा पोलिसांनी संध्याच्या आईला फोन करून शरीराचे अवयव दाखवले तेव्हा ती थक्क झाली. तिने टॅटू आणि जन्मचिन्हे पाहून मृतदेह लेकीचं असल्याचं ओळखलं. नंतर, डीएनए चाचणीत तो मृतदेह अभिनेत्री संध्याचा असल्याचे सिद्ध झाले.
पोलिसांनी बालकृष्णनला अटक केली. सुरुवातीला त्याने असा दावा केला की, तो 19 जानेवारी रोजी त्याच्या वडिलांच्या घरी गेला होता आणि परतलाच नाही. सखोल चौकशीनंतर, बालकृष्णनने त्या जानेवारी रात्री पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, बालाकृष्णन आणि संध्या यांचं लग्न 17 वर्षांपूर्वी झालं होतं. सुरुवातीला सर्वकाही ठिक होतं. पण नंतर दोघांमध्ये वाद होवू लागले. 2010 मध्ये, बालकृष्णन याने एक सिनेमा बनवला जो फ्लॉप झाला. त्यांनंतर आर्थिक अडचणी, संघर्ष आणि संशय सुरू झाल्या. अशात संध्या तिच्या वडिलांकडू निघून गेली. पण त्यानंतर कामाच्या शोधात पुन्हा चेन्नईत आली.
बालाकृष्णन पुन्हा तिला परत घेऊन आला. पण त्याचा संशय दूर झाल नाही. हळू – हळू संशयाचं रुपांतर रागात झालं आणि अखेर रागात त्याने संध्याची हत्या केली… भांडण झाल्यानंतर संध्या घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना, बालकृष्णनने कुऱ्हाडीने तिचा गळा कापला. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
