AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केएल राहुल ‘या’ गोष्टीला घाबरतो प्रचंड, मोठा खुलासा, म्हणाला, भीती आणि…

भारतीय क्रिकेटर केएल राहुल हा कायमच चर्चेत असतो. केएल राहुल सोशल मीडियावर सक्रिय असतो. केएल राहुल याने सुनील शेट्टी यांची लेक अथिया शेट्टी हिच्यासोबत लग्न केले. काही वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. जावई केएल राहुलला सपोर्ट करण्यासाठी सुनील शेट्टी अनेकदा स्टेडियमवर पोहोचतात.

केएल राहुल 'या' गोष्टीला घाबरतो प्रचंड, मोठा खुलासा, म्हणाला, भीती आणि...
KL Rahul
| Updated on: Aug 25, 2024 | 12:17 PM
Share

नुकताच क्रिकेटर केएल राहुल याने मोठा खुलासा केलाय. आपल्याला आजही एका गोष्टीची प्रचंड भीती वाटत असल्याचे केएल राहुल याने म्हटले. केएल राहुल आणि हार्दिक पांड्या हे काही वर्षांपूर्वी करण जोहर याच्या चॅट शोमध्ये पोहोचले होते. यावेळी केएल राहुल याने असे काही भाष्य केले होते की, त्याच्यावर जोरदार टीका करण्यात आली. फक्त टीकाच नाही तर थेट त्याला भारतीय क्रिकेट टीममधून काही दिवसांसाठी निलंबित देखील करण्यात आले. मोठा वाद त्यानंतर बघायला मिळाला. आता त्यावरच पहिल्यांदा बोलताना केएल राहुल हा दिसलाय.

नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये केएल राहुल म्हणाला की, ती मुलाखत खूप जास्त वेगळी होती आणि त्यानंतर सर्वच काही बदलून गेले. मला खरोखरच लाज वाटत होती. त्यावेळी मी टीममधून निलंबित झालो होतो. मला माझ्या शाळेच्या आयुष्यातही कधीच कोणतीही शिक्षा मिळाली नव्हती. यामुळे मला हे कळत नव्हते की, परिस्थितीला नेमके कसे सामोरे जाऊ.

2019 मध्ये केएल राहुल आणि हार्दिक पांड्या हे करण जोहरच्या चॅट शोमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी असे काही भाष्य केले होते की, ते लोकांना अजिबातच आवडले नव्हते. लोकांनी त्यांचा जोरदार विरोध केला. हा विषय इतका जास्त वाढला होता की, त्यांना टीममध्ये निलंबित करण्यात आले.

फक्त निलंबितच नाही तर करण जोहर याच्या शोचा तो एपिसोड देखील सोशल मीडियावरून हटवण्यात आला. आता त्याच वादाबद्दल बोलताना केएल राहुल हा दिसतोय. हेच नाही तर केएल राहुल याने हे देखील मान्य केले की ते चुकीचे होते. त्यावेळी केएल राहुल याच्या समस्यांमध्ये चांगलीच वाढ झाली होती.

लोक सतत केएल राहुल याच्यावर टीका करताना दिसले. केएल राहुल हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे. मुंबईमध्ये अत्यंत आलिशान असे घर देखील केएल राहुल याचे आहे. काही दिवसांपूर्वीच केएल राहुल याची पत्नी आणि अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी हिने त्यांच्या घराची खास झलक आपल्या चाहत्यांना दाखवली होती.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा