पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी हटणार? भारत सरकारने SCO चित्रपट महोत्सवासाठी घेतला मोठा निर्णय

| Updated on: Jan 28, 2023 | 9:36 AM

उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती, पण SCO चित्रपट महोत्सवासाठी घेतलेल्या निर्णयानंतर पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी हटणार?

पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी हटणार? भारत सरकारने SCO चित्रपट महोत्सवासाठी घेतला मोठा निर्णय
पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी हटणार? भारत सरकारने SCO चित्रपट महोत्सवासाठी घेतला मोठा निर्णय
Follow us on

मुंबई : ‘शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन’ (SCO) चित्रपट महोत्सव नुकताच सुरु झाला आहे. सध्या सर्वत्र चित्रपट महोत्सवाची चर्चा सुरु आहे. चित्रपट महोत्सवादरम्यान केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाषण केलं. अन्य देशांसोबतच पाकिस्तान देशाला देखील चित्रपट महोत्सवासाठी आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. पण चित्रपट महोत्सवात पाकिस्तानातील कलाकारांनी उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला नाही. ‘शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन’ (SCO) चित्रपट महोत्सवात अनेक कलाकार उपस्थित राहतात.

पाकिस्तानी कलाकारांना देखील आमंत्रण

अनुराग ठाकूर म्हणाले, ‘जेव्हा कोणत्याही मल्टीनॅशनल टुर्नामेंटचं आयोजन केलं जातं, तेव्हा आम्ही त्या सर्व देशांना उपस्थित राहण्यास सांगितलं आहे, जे या जगाचा भाग आहेत. कार्यक्रमात उपस्थित रहायचं की नाही, हा समोरच्या देशाचा निर्णय आहे. आम्ही SCO च्या सर्व सदस्यांना आमंत्रण पाठवलं आहे. असं देखील अनुराग ठाकूर म्हणाले.

पुढे अनुराग ठाकूर म्हणाले, ‘आमच्या कडून आमंत्रण पाठवण्यात आलं आहे. आम्ही सर्वांसाठी दरवाजे खुले ठेवले आहेत.’ दरम्यान अनुराग ठाकूर यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी हटणार का? अशी चर्चा रंगत आहे. शिवाय पाकिस्तानी कलाकार माहिरा खाण आणि फवाद खान यांना पुन्हा भारतीय सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळणार का? अशा अनेक चर्चा सध्या जोर धरत आहेत.

अनुराग ठाकूर यांना पाकिस्तानी कलाकारांवरील बंदी हटली का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, ‘सध्या ही गोष्ट SCO पर्यंत मर्यादित राहूद्या.’ ‘शंघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन’ (SCO) चित्रपट महोत्सव शुक्रवारी सुरु झाला असून ३१ जानेवारी पर्यंत असणार आहे.

सांगायचं झालं तर, उरी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती. उरी हल्ल्यापूर्वी अनेक पाकिस्तानी अभिनेते, अभिनेत्री आणि गायक बॉलिवूडमध्ये काम करत होते.