Indian Idol 12 | ‘इंडियन आयडॉल 12’च्या मंचावर आणखी एक प्रेमकथा? सायली कांबळेने ‘या’ स्पर्धकावरील प्रेम केले व्यक्त!

‘इंडियन आयडॉल 12’मध्ये (Indian Idol 12) स्पर्धक पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि अरुणिता (Arunita Kanjilal) यांचा लव्ह अँगल बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहेत. चाहत्यांना देखील दोघांची जोडी खूप आवडते. दरम्यान, आता आणखी एक जोडी बरीच चर्चेत येत आहे.

Indian Idol 12 | ‘इंडियन आयडॉल 12’च्या मंचावर आणखी एक प्रेमकथा? सायली कांबळेने ‘या’ स्पर्धकावरील प्रेम केले व्यक्त!
सायली कांबळे

मुंबई : ‘इंडियन आयडॉल 12’मध्ये (Indian Idol 12) स्पर्धक पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि अरुणिता (Arunita Kanjilal) यांचा लव्ह अँगल बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहेत. चाहत्यांना देखील दोघांची जोडी खूप आवडते. दरम्यान, आता आणखी एक जोडी बरीच चर्चेत येत आहे, ती म्हणजे निहाल (Nihal Tauro) आणि सयाली कांबळे (Sayali Kamble). वास्तविक, या कार्यक्रमाचा नवा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये निहालच्या सादरीकरणानंतर आदित्य म्हणतो की, जेव्हा निहाल गात होता तेव्हा सयाली देखील संपूर्ण गाणं गुणगुणत होती. त्यानंतर सयाली म्हणते की, आम्ही दोघेही टॉम आणि जेरीसारखे आहोत आणि माझे त्याच्यावर प्रेम आहे (Indian Idol 12 New update Sayali kamble said I love nihal on stage).

यानंतर निहाल म्हणतो की, सायली नेहमीच त्याची गाण्यात मदत करते. यावर सायली म्हणते की, हा भाग जरी गर्ल्स व्हर्सेस बॉईजचा असला, तरी निहालचे सादरीकरण चांगले होईल, अशी तिला आशा आहे. या भागात अनु मलिक मुलींच्या टीमचे कॅप्टन होते. मनोज मुंटाशीर ‘बॉईज’ संघाचे कॅप्टन होते.

पाहा नवा प्रोमो व्हिडीओ

प्रोमोमध्ये आपण पाहू शकता की निहाल, ‘दिल क्या करे’ हे गाणे गातो. तर, सायली देखील हेच गाणे गुणगुणते.

या शोच्या टीआरपीबद्दल सांगायचे, तर हा शो सद्या ‘टॉप 5’च्या यादीतही नाही. गेल्या आठवड्यात हा कार्यक्रम पहिल्या क्रमांकावर होता. तथापि, काही काळ ट्रोल झाल्यामुळे शोचा टीआरपी कमी झाला आहे (Indian Idol 12 New update Sayali kamble said I love nihal on stage).

षण्मुखप्रियावरून वाद

स्पर्धक षण्मुखप्रियामुळे गेल्या काही दिवसांपासून हा शो खूप चर्चेत होता. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे षण्मुखप्रिया हटवण्याची मागणी केली होती. तथापि, यामुळे षण्मुखप्रियाला काही फरक पडला नाही. ती म्हणाली की, ती नेहमीच अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करते आणि तिला माहित आहे की, तिचे चाहते तिच्यावर खूप प्रेम करतात.

नेहा परतणार!

या कार्यक्रमात नेहा कक्कर, हिमेश रेशमिया आणि विशाल दादलानीसह अनु मलिक आणि मनोज मुंटाशीर सध्या परीक्षकाची भूमिका पार पाडत आहेत. तथापि, काही दिवसांपासून गायब असलेली नेहा आता लवकरच शोमध्ये परतणार आहे. कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी तिने शोमधून ब्रेक घेतला होता आणि आता लवकरच ती शोमध्ये पुन्हा दिसणार आहे.

(Indian Idol 12 New update Sayali kamble said I love nihal on stage)

हेही वाचा :

Ram Setu | ‘रामसेतु’च्या चित्रीकरणाला ‘या’ दिवशी सुरुवात होणार! कोरोनाला मात दिल्यानंतर अक्षय कुमार कामासाठी सज्ज!

Idian Idol 12 | अभिजीत सावंतनंतर मियांग चँगची ‘इंडियन आयडॉल’वर प्रतिक्रिया, कॉन्ट्रोवर्सीबद्दल बोलताना म्हणाला…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI