AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IBD 3 : पुण्याच्या समर्पण लामा याने जिंकली ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ची ट्रॉफी, पुरस्कारासह मिळाले इतके रुपये

IBD 3 : 'इंडियाज बेस्ट डान्सर 3'ची ट्रॉफी जिंकली पुण्याचा समर्पण लामा याने, विजेत्यासह कोरिओग्राफर देखील मिळाले इतके रुपये... खुद्द समर्पण लामा याने व्यक्त केल्या भावना... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पुण्याच्या समर्पण लामा याची चर्चा... चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव...

IBD 3 : पुण्याच्या समर्पण लामा याने जिंकली 'इंडियाज बेस्ट डान्सर 3'ची ट्रॉफी, पुरस्कारासह मिळाले इतके रुपये
| Updated on: Oct 01, 2023 | 8:14 AM
Share

मुंबई : 1 ऑक्टोबर 2023 | ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ची ट्रॉफी कोण जिंकेल याच्याकडे अनेकांच्या नजरा होता. अखेर ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ ची ट्रॉफी पुण्याच्या समर्पण लामा याने जिंकली आहे. ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ ट्रॉफीवर स्वतःचे नाव कोरल्यामुळे समर्पण लामा याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सध्या सर्वत्र समर्पण लामा याची चर्चा रंगली आहे. समर्पण लामा याला ट्रॉफीसह १५ लाख रुपयांचा बक्षीस देखील मिळालं आहे. समर्पण लामा याने ट्रॉफी जिंकल्यामुळे पुण्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. यावेळी फक्त समर्पण लामा यालाच नाही तर, त्याची कोरिओग्राफर भावना खंडुजा यांनाही देखील बक्षीस देवून सन्मानित करण्यात आलं आहे. कोरिओग्राफर भावना खंडुजा यांना ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. कारण इंडियाज बेस्ट डान्सर या शोच्या मंचावर स्पर्धक त्यांच्या नृत्यदिग्दर्शकांसोबत परफॉर्म करतात.

अभिनेते गोविंदा आणि अभिनेत्री क्रिती सॅनन यांच्या उपस्थितीत इंडियाज बेस्ट डान्सरचा ग्रँड फिनाले सुरू झाला. समर्पण लामा याच्यासह शिवांशू सोनी, अंजली ममगाई, विपुल कंदपाल आणि अनिकेत चौहान यांचाही टॉप 5 मध्ये समावेश होता. शेवटच्या क्षणी टॉप ५ स्पर्धांच्या मनावर दडपण होतं. अखेर विजेता म्हणून समर्पण लामा याच्या नावाची घोषणा झाली आणि त्याच्या चाहत्यांनी कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला.

‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर समर्पण लामा याने आनंद व्यक्त केला. ‘मी कायम टीव्हीवर शो पाहायचो. शो पाहिल्यानंतर मी देखील स्वप्न पाहायला लागलो होतो. पण इंडियाज बेस्ट डान्सर सारख्या शोचा विजेता होईल असे मला कधीच वाटले नव्हतं..’ सध्या सर्वत्र समर्पण लामा याची चर्चा रंगली आहे.

पुढे अभिनेता म्हणाला, ‘माझ्यासाठी हे सर्वकाही स्वप्नासारखं आहे. जेव्हा अनिकेत चौहानसह परीक्षकांनी मला ‘टॉप 13’मध्ये प्रवेश दिला, तेव्हा तो माझा विजय होता. कारण शोमध्ये मी एवढ्या पुढे जाऊ शकेन याची मला कल्पना नव्हती. शोमध्ये मला यश मिळालं, पण अनेक ठिकाणी मी मागे राहिलो… असं देखील समर्पण म्हणाला..

‘ज्या गोष्टींमध्ये मला अपयश मिळाले, त्यातून मी खूप काही शिकलो आणि पुढे प्रवास सुरु केला. अधिक मेहनत घेतली. मी प्रचंड मेहनत, कष्ट केले आणि ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली.. हा शो कायम माझ्या स्मरणात राहिल. मी सर्वांचे आभार मानतो, ज्यांनी मला मतदान केलं.’ असं देखील समर्पण लामा म्हणाला.

Follow Us
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....