India’s Got Latent Row: दोन्ही हात पकडले, जिन्यावरून ओढलं… रणवीर अलाहाबादियाला पोलिस चौकशीसाठी असं नेलं जणू..
India's Got Latent Row : रणवीर अलाहाबादियाने गुवाहाटी पोलिसांसमोर आपलं म्हणणं मांडलं. पोलिसांनी युट्यूबरची 4 तासांहून अधिक काळ चौकशी केली. यावेळी युट्युबरने पोलिसांना पूर्ण सहकार्य केले.

‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणाने मोठा गदारोळ माजला होता. हे वक्तव्य करणारा प्रसिद्ध यूट्यूबर, इन्फ्लुएन्सर रणवीर अलाहाबादिया याच्या अडचणी प्रचंड वाढल्या. याचप्रकरणी शुक्रवारी (7 मार्च) गुवाहाटी पोलिसांनी त्याची चौकशी केली. रणवीर हा गुरुवारी रात्रीच चौकशीसाठी आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आणि तेथे ते गुन्हे शाखेसमोर हजर झाला. शुक्रवारी त्याची अनेक तास चौकशी करण्यात आली आणि यावेळी अलाहाबादिया याच्यासह त्याचे वकीलही उपस्थित होते.
याचदरम्यान रणवीर अलाहाबादियाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये गुवाहाटी पोलीस त्याला चौकशीसाठी घेऊन जात आहेत. पांढरा शर्ट घातलेल्या अलाहाबादियाचे दोन्ही हात पोलिस पकडून त्याला पायऱ्यांवरून खेचत नेताना या व्हिडीओमध्ये दिसले आहे. एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे रणवीरला चौकशीसाठी नेतानाचे हे दृश्य पाहून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहेत.
4 तासांहून अधिक काल चौकशी
यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाची चौकशी करणाऱ्या पोलिस समितीचे नेतृत्व सहआयुक्त अंकुर जैन यांनी केले. ‘रणवीर दुपारी 12.30 वाजता गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचला आणि त्यांची चौकशी चार तासांपेक्षा जास्त काळ चालली. त्यांनी पोलिसांना सहकार्य केले आणि आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली’ असे चौकशीनंतर जैन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
चार जणांचे जबाब अद्याप बाकी
आपण पोलिसांना नेहमी सहकार्य करून असे आश्वासन रणवीर अलाहाबादियाने पोलिसांना दिले आहे. या खटल्यासाठी जेव्हाही बोलावले जाईल, तेव्हा आपण गुवाहाटीला येऊन, असेही त्याने सांगितल्याचे त्यांनी नमूद केलं. याप्रकरणाचा तपास अद्याप बाकी असून आणखी चार जणांचा जबाब बाकी आहे. शोमधील तीन स्पर्धक अजून आमच्यासमोर हजर झालेले नाहीत. आम्ही त्यांना मेल पाठवला आहे, पण ते अजून देशाबाहेर आहेत. आम्ही त्यांना पुन्हा नोटीस पाठवू आणि त्यानुसार कारवाई करू. पाच यूट्यूबर्ससह, ज्या ठिकाणी हा शो शूट झाला त्या ठिकाणच्या मालकाची नावे देखील एफआयआरमध्ये नोंदवण्यात आली आहेत, असे पोलिसांनी नमूद केलं,
आशिष चंचलानीला अटकपूर्व जामीन
इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणातगुवाहाटी पोलिसांनी यूट्यूबर आशिष चंचलानी याची 27 फेब्रुवारी रोजी चौकशी केली होती. यानंतर 18 फेब्रुवारी रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाने चंचलानी यांना अंतरिम जामीन मंजूर केला. आता आशिष चंचलानी यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. न्यायालयाने चंचलानीला अटकपूर्व जामीन मंजूर केला, असे यूट्यूबरचे वकील जॉयराज बोरा यांनी सांगितल.
काय आहे प्रकरण ?
युट्युबर आणि कॉमेडियन रणवीर अलाहाबादियाच्या एका अश्लील प्रश्नाने सोशल मीडियावर वादळ निर्माण केले. फेसबुकवर तसेच आणि एक्सच्या प्लॅटफॉर्मवर लोक रणवीर अलाहाबादियाला प्रचंड ट्रोल केलं. रणवीर अलाहाबादिया हा इंडियाज गॉट लेटेंट ( India’s Got Latent) शोमध्ये आला होता. त्याच्यासह या शोमध्ये समय रैना, कंटेंट क्रिएटर आशीष चंचलानी, जसप्रीत सिंह आणि रिबेल कीड नावाने ओळखला जाणारा अपूर्व मुखीजा हे जज म्हणून सहभागी झाले होते. याच शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला अश्लील, विवादास्पद प्रश्न विचारला, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रणवीर अलाहाबादियाने शोमधील एका स्पर्धकाला विचारले, “तुम्ही तुमच्या पालकांना आयुष्यभर दररोज इंटिमेट होताना पाहाल का किंवा एकदाच सहभागी होऊन ते कायमचे थांबवाल?” असा भयानक प्रश्न त्याने विचारला. त्याच्या या अतिशय असभ्य प्रश्नावरून प्रचंड गदारोळ निर्माण झाला.
