ॲक्शन सीन दरम्यान जॉन अब्राहमला दुखापत, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती! 

बॉलिवूडचा अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आगामी ‘अटॅक’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

ॲक्शन सीन दरम्यान जॉन अब्राहमला दुखापत, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती! 

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आगामी ‘अटॅक’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच एका अ‍ॅक्शन सीन दरम्यान तो जखमी झाला. जॉन अब्राहमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करुन ही माहिती दिली आहे. जॉन अब्राहमने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. फोटोमध्ये जॉन अब्राहम शूटिंग दरम्यान ट्यूबलाइटचा अ‍ॅक्शन सीन करत होता आणि त्यावेळीच तो जखमी झाला आहे. (Injured John Abraham during the action scene)

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

व्हिडीओमध्ये चित्रपटाच्या टीममधील एक सदस्य जॉनच्या गळ्याच्या तिथून येणारे रक्त पुसताना दिसत आहे. जॉन अब्राहमने ही पोस्ट शेअर करताना लिहिले की, ‘ज्या मार्गाने हे सुरू झाले आणि पुढे जात आहे चांगले वाटत आहे. या व्हिडीओमध्ये, मेकअप आर्टिस्ट सांगताना दिसत आहे की, हा लाल रंग नसून प्रत्यक्षात रक्त आहे. लक्ष्यराज आनंद दिग्दर्शित ‘अ‍टॅक’ मध्ये रकुलप्रीत सिंग जॉन अब्राहमसोबत दिसणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

यापूर्वीही जॉन अब्राहम ‘सत्यमेव जयते 2’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाला होता. अ‍ॅक्शन सीन शूट करताना त्याला दुखापत झाली होती. ज्यामुळे शूटिंग मध्येच थांबवावे लागला होती. शूटच्या पहिल्याच दिवशी जॉन अब्राहमला दुखापत झाल्याने त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले होते. रुग्णालयात प्रथमोपचार दिल्यानंतर त्यांना सोडण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

जॉन अब्राहमला चेत सिंह किल्ल्याजवळ शूटिंग दरम्यान दुखापत झाली होती. जॉन अब्राहमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर केली होती. हा चित्रपट ईदच्या निमित्ताने 14 मे रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या :

‘धोनी’ सिनेमातील अभिनेत्याची आत्महत्या, सुशांतचे चाहते सोशल मीडियावर आक्रमक

माझ्या ट्विटमुळे कुठलाही हिंसाचार झाला नाही; कंगना रनौतचा युक्तिवाद

अक्षय कुमारसोबत ‘केसरी’मध्ये काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या, मृत्यूपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

(Injured John Abraham during the action scene)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI