‘ललित 205’ मधील भैरवीबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत?

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ललित 205’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतं आहे. या मालिकेत ‘भैरवी’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अमृता पवारच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अर्थात, अभिनेत्री अमृता पवारच्या प्रवासाबद्दल अनेकांना कुतुहल आहे. आम्ही तुमच्यासाठी अमृता पवारबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत : अमृता खो-खो या खेळामध्ये पारंगत असली तरी अभिनय हाच तिचा श्वास आहे. अभिनयाच्या …

‘ललित 205’ मधील भैरवीबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत?

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ललित 205’ या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतं आहे. या मालिकेत ‘भैरवी’ची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अमृता पवारच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अर्थात, अभिनेत्री अमृता पवारच्या प्रवासाबद्दल अनेकांना कुतुहल आहे. आम्ही तुमच्यासाठी अमृता पवारबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत :

  • अमृता खो-खो या खेळामध्ये पारंगत असली तरी अभिनय हाच तिचा श्वास आहे. अभिनयाच्या याच वेडापायी तिची खेळामधली आवड मागे पडली. कॉलेजमधून एकांकिका करत  असतानाच स्टार प्रवाहच्या ‘दुहेरी’ या मालिकेत काम करण्याची अमृताला संधी मिळाली आणि तिथूनच तिच्या अभिनय वाटचालीला सुरुवात झाली. ‘ललित २०५’ मधून भैरवीच्या रुपात ती पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत झळकली. अमृताने नृत्याचंही प्रशिक्षण घेतलंय.

  • विखुरलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी भैरवी म्हणजे जुन्या आणि नव्या विचारांमधला दुवा. भैरवीप्रमाणेच अमृताही आपल्या कुटुंबाला पहिलं प्राधान्य देते. तिच्या मते नाती जपणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. भैरवी प्रमाणेच अमृताही खऱ्या आयुष्यात रोखठोक आहे. आपल्या मनातली गोष्ट स्पष्टपणे मांडायला हवी असं तिला वाटतं.

  • अमृता आपल्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड जागृक आहे. सकस आहार आणि नियमित व्यायाम हेच आपल्या फिटनेसचं रहस्य असल्याचं ती सांगते. पण फिटनेसच्या हट्टापायी मन मारुन जगणं तिला पटत नाही. एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर मी आवर्जून खाते असं अमृताने सांगितलं.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *