AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देख तुनी सासू कशी नाची रायनी.. आयरा खानच्या सासूचा डान्स पाहून सर्वच थक्क!

आयरा खानची सासू प्रितम शिखरे या प्रोफेशनल डान्सर आहेत. मुलाच्या लग्नात त्यांनी खास डान्स केला होता. त्याचाच व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

देख तुनी सासू कशी नाची रायनी.. आयरा खानच्या सासूचा डान्स पाहून सर्वच थक्क!
Ira Khan's mother in lawImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 16, 2024 | 11:40 AM
Share

मुंबई : 16 जानेवारी 2024 | अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान नुकतीच लग्नबंधनात अडकली. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी तिने धूमधडाक्यात लग्न केलं. नुपूर हा सेलिब्रिटी फिटनेस प्रशिक्षक आहे. तर नुपूरची आई म्हणजेच आयराची सासू प्रितम शिखरे या प्रोफेशनल डान्सर आहेत. मोठमोठे सेलिब्रिटीही त्यांच्या नृत्याचे चाहते आहेत. नुकतंच प्रितम शिखरे यांनी आयरा आणि नुपूरच्या लग्नात एक डान्स व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला असून त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

प्रितम शिखरे यांनी मुलाच्या लग्नात हा अप्रतिम डान्स केला आहे. त्यांना नृत्याची खूप आवड आहे. याच आवडीमुळे त्या प्रोफेशनल डान्सर बनल्या आहेत. आयरा आणि नुपूरच्या लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी जबरदस्त डान्स केला. खुद्द प्रितम शिखरे यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ‘आयरा खानला आमच्या आयुष्यात आल्याचं पाहून मी खूप खुश आहे’, असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओमध्ये प्रितम या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्यासोबत बाजूला आणखी दोघी जणी नाचत आहेत.

पहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by PRITAM S. (@pritam_shikhare)

मुंबईमध्ये 3 जानेवारी रोजी नोंदणी पद्धतीने लग्न केल्यानंतर राजस्थानमधील उदयपूरमध्ये आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी धूमधडाक्यात लग्न केलं. उदयपूरमध्ये या दोघांनी ख्रिश्चन पद्धतीने एकमेकांना आयुष्याभराची साथ देण्याचं वचन दिलं. यावेळी आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता जेव्हा मुलीचा हात धरून घेऊन येत होते, तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. इतकंच नव्हे तर आयरा आणि नुपूर एकमेकांना अंगठी घालतानाही आमिरचे डोळे पाणावले होते.

आयरा आणि नुपूर यांनी सप्टेंबर 2022 मध्ये साखरपुडा केला होता. आयरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. तर नुपूर शिखरे हा फिटनेस ट्रेनर आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना त्याने फिटनेस ट्रेनिंग दिली आहे. यात आमिर खान आणि सुष्मिता सेन यांचाही समावेश आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.