Irrfan Khan Death Anniversary | रुग्णालयात काय घडलं त्या रात्री? पत्नी सुतापाने शेअर केल्या इरफानच्या आठवणी..

बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) गेल्या वर्षी 29 एप्रिलला या जगाचा निरोप घेऊन निघून गेला. अभिनेत्याचे कुटुंबिय आणि चाहते आजही त्याची खूप आठवण काढतात.

Irrfan Khan Death Anniversary | रुग्णालयात काय घडलं त्या रात्री? पत्नी सुतापाने शेअर केल्या इरफानच्या आठवणी..
इरफान खान

मुंबई : बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) गेल्या वर्षी 29 एप्रिलला या जगाचा निरोप घेऊन निघून गेला. अभिनेत्याचे कुटुंबिय आणि चाहते आजही त्याची खूप आठवण काढतात. अभिनेत्याच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांची पत्नी सुतापाने (Sutapa Sikdar) आठवण शेअर केली आहे. सुतापाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे आणि अभिनेत्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री काय घडले, तसेच त्याच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे दिवसांची आठवण शेअर केली आहे (Irrfan Khan Death Anniversary Wife Sutapa Sikdar share Irrfan khan last memories).

28 एप्रिलच्या रात्रीची एक आठवण शेअर करताना सुतापाने एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले, ‘गेल्या वर्षी या दिवशी, माझे मित्र आणि मी तुझ्यासाठी गाणी गात होतो. आपली सर्व आवडती गाणी. तेथील नर्स आमच्याकडे विचित्रपणे पाहत होत्या कारण, त्यांनी नेहमीच अवघड काळात लोकांना देवाचे नाव घेताना पाहिले आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून मी तुमच्यासाठी सकाळी, संध्याकाळ आणि रात्री तेच केले होते. आपण चांगल्या आठवणींना सोबत घेऊन जावे, अशी माझी इच्छा होती. म्हणून, आम्ही सगळे गाणे गात होतो. दुसर्‍या दिवशी तू आम्हाला सोडून पुढच्या प्रवासाला निघून गेलास. मला आशा आहे की, माझ्याशिवाय कोठे जायचे हे तुला ठाऊक असेल.

पाहा सुतापा सिकदर यांची पोस्ट :

“People living deeply have no fear of death”… Anaïs Nin
your favourite poet Irrfan. Last year tonight me and my friends…

Posted by Sutapa Sikdar on Wednesday, 28 April 2021

सुतापाने पुढे लिहिले, ‘363 दिवस 8712 तास. जेव्हा मी प्रत्येक सेकंद मोजत होते. काळाचा हा समुद्र बघता बघता संपून गेला. 29 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11:11 वाजता त्याचे घड्याळ कसे थांबले, हे देखील त्यांनी सांगितले. त्यावेळी इरफानने अलविदा करत घेऊन जगाचा निरोप घेतला (Irrfan Khan Death Anniversary Wife Sutapa Sikdar share Irrfan khan last memories).

इरफानच्या मृत्यूनंतर सुतापाचे आयुष्य…

इरफानने हे जग सोडल्यानंतर सुतापाने दिवस कसा घालवला हे आठवत त्या म्हणाल्या, ‘त्याच्या जाण्याने माझे नाव बदलण्याबरोबरच माझ्यावर अनेक जबाबदाऱ्याही आल्या. अभिनेत्याच्या मृत्यूनंतर आपले नाव बदलणे आपल्यासाठी किती अवघड आहे, हे त्याने सांगितले. त्या पुढे लिहितात, ‘मी त्याच्या नावापासून माझे नाव वेगळे करून केवळ सुतापा केले. ते लिहायला माझी बोटं देखील धजावत होती. मी सही देखील करू शकले नाही, मी एक दिवस ब्रेक घेतला आणि हे नाव माझ्या मनात सतत होलात राहिले.’

सुतापा आणि इरफान यांची पहिली भेट

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे दिवस आठवताना सुतापाने आपली आणि इरफानची भेट कशी झाली ते सांगितले. त्याने तिचे नाव चुकीचे घेतले होते. पोस्टच्या शेवटी, सुतापाने त्या लोकांबद्दलही लिहिले ज्यांचा साथीच्या काळात मृत्यू झाला होता आणि त्यांचे अंत्य संस्कार नीट केले गेले नाहीत. त्यांनी लिहिले, ‘तुम्ही सर्वजण शांतीने रहा आणि लक्षात ठेवा की आम्ही सर्व तुमच्यावर खूप प्रेम करतो.’

(Irrfan Khan Death Anniversary Wife Sutapa Sikdar share Irrfan khan last memories)

हेही वाचा :

‘दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा’, वाचा सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ऋषिकेश रिकामेबद्दल…

कोरोनामुळे जेष्ठ कलाकारांवर घरी बसण्याची वेळ, ‘तारक मेहता’चे नट्टूकाका ते ‘वागळे’च्या अम्मांची व्यथा!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI