‘दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा’, वाचा सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ऋषिकेश रिकामेबद्दल…

‘दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा’, वाचा सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या ऋषिकेश रिकामेबद्दल...
ऋषिकेश रिकामे

सध्या सोशल मीडिया म्हटले की एखादा व्हिडीओ चर्चेत येण्यास फारसा वेळ लागत नाही. यातच सध्या इंटरनेटवर एका सुमधुर आवाजाची खूप चर्चा होते. गावाकडचा हा गडी सध्या लोकांमध्ये खूप चर्चिला जातोय.

Harshada Bhirvandekar

|

Apr 29, 2021 | 1:57 PM

मुंबई : सध्या सोशल मीडिया म्हटले की एखादा व्हिडीओ चर्चेत येण्यास फारसा वेळ लागत नाही. यातच सध्या इंटरनेटवर एका सुमधुर आवाजाची खूप चर्चा होते. गावाकडचा हा गडी सध्या लोकांमध्ये खूप चर्चिला जातोय. नाशिकमधील विंचूर गावातील ऋषिकेश रिकामे (Rushikesh Rikame) या तरुणाने शेत-शिवारात गाणी गात रसिकांचं मनोरंजन करण्यास सुरुवात केली आहे. चला तर जाणून घेऊया इंटरनेटच्या या जंजाळात सध्या चर्चेत आलेल्या  ऋषिकेश रिकामेबद्दल…(Know about Social media viral singer Rushikesh Rikame)

कोण आहे ऋषिकेश रिकामे?

नाशिकमधील विंचूर गावात राहणारा ऋषिकेश रिकामे हा त्याच्या दमदार आवाजामुळे लोकांच्या पसंतीस उतरला आहे. सध्या ऋषिकेशचे शेतातील गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. ऋषिकेशला गाण्याची आवड बालपणापासूनच होती. हा छंद त्याला त्याच्या वडिलांमुळे जडला होता. ऋषिकेश लहान असताना त्याचे वडील त्याला भजनाला घेऊन जायचे. इथूनच त्याला गाण्याची आवड लागली.

‘या’मुळे झाली ऋषिकेशच्या गाण्याची चर्चा!

सध्या कोरोनामुळे सगळीकडेच एक नकारात्मक वातावरण तयार झाले आहे. या वातावरणात अनेकांनी आपली जवळची माणसं गमावली आहेत. अनेक जीवनावश्यक गोष्टींसाठी लोक रोज झगडत आहेत. याच वातावरणाशी साधर्म्य साधणारं गाणं ‘देवाविना माणसाची जिंदगानी एकटी…’ हे आपल्या आवाजात गात त्याने त्याचा व्हिडीओ तयार केला. हा व्हिडीओ त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट आणि युट्यूबवर देखील अपलोड केला. सध्याची स्थिती आणि त्यात ऋषिकेशचा आवाज-गाणं रसिकांना इतकं आवडलं की, पाहता पाहता हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणावर चर्चेत आला. हे त्याचं पाहिलंच गाणं इतकं चर्चेत आल्याने त्याने आपला हा प्रवास पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला (Know about Social media viral singer Rushikesh Rikame).

पाहा ऋषिकेशचा व्हिडीओ

कवी अनंत राऊत यांनी लिहिलेली लिहिलेली ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’ ही कविता त्याने गाऊन सादर केली आहे. त्याच्या या प्रतिभेला रसिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

सोशल मीडिया प्रभावी माध्यम

या विषयी सांगताना ऋषिकेश म्हणतो की, ‘सध्याच्या काळात सोशल मीडिया हे अतिशय प्रभावी माध्यम बनलं आहे. या मध्यमाद्वारे आपण एकाचवेळी अनेक लोकांपर्यंत पोहचू शकतो. या आधी देखील मी गाणी गात होतो. अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्येही प्रयत्न केला. पण अद्याप त्यात काही यश आलेलं नाही. मग मी माझी गाणी युट्युबला अपलोड करण्यास सुरुवात केली. आणि बघता बघता त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला.’

(Know about Social media viral singer Rushikesh Rikame)

हेही वाचा :

कोरोनामुळे जेष्ठ कलाकारांवर घरी बसण्याची वेळ, ‘तारक मेहता’चे नट्टूकाका ते ‘वागळे’च्या अम्मांची व्यथा!

‘तुमच्याकडे करोडो रुपये, ऑक्सिजन सिलेंडर देऊन देशाची मदत करा’, राखी सावंतचा कंगनावर हल्लाबोल!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें