‘तुमच्याकडे करोडो रुपये, ऑक्सिजन सिलेंडर देऊन देशाची मदत करा’, राखी सावंतचा कंगनावर हल्लाबोल!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) या अशा सेलेब्रिटी आहेत, ज्या कोणत्याही विषयावर बोलण्यास अजिबात घाबरत नाही.

‘तुमच्याकडे करोडो रुपये, ऑक्सिजन सिलेंडर देऊन देशाची मदत करा’, राखी सावंतचा कंगनावर हल्लाबोल!
कंगना रनौत, राखी सावंत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि राखी सावंत (Rakhi Sawant) या अशा सेलेब्रिटी आहेत, ज्या कोणत्याही विषयावर बोलण्यास अजिबात घाबरत नाही. यासह, दोघीही कोणावरही भाष्य करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. आता राखीने अलीकडेच कंगना रनौतला एक संदेश दिला आहे. नुकतीच राखी एका ठिकाणी स्पॉट झाली होती. या दरम्यान, राखीने पापाराजींशी संवाद साधला आणि त्यादरम्यान तिने कंगनाला ऑक्सिजन सिलेंडर दान करण्यासही सांगितले (Rakhi Sawant Slams Kangana Ranaut over Corona Situation).

राखीला विचारले गेले की, ‘कंगनाजी सतत असे म्हणत आहेत की, आजकाल देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. बर्‍याच ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही, आपल्यासाठी, देशासाठी, कंगनाजींच्या या वक्तव्यावर काय म्हणायचे आहेत? यानंतर राखी म्हणाली, ‘कंगना जी, कृपया देशाची सेवा करा. आपल्याकडे इतके कोट्यावधी रुपये आहेत. त्यातून ऑक्सिजन खरेदी करा आणि लोकांमध्ये वितरित करा, आम्ही तर हेच करत आहोत.’

याशिवाय राखीने सर्वांना दुहेरी मास्क घालण्यास, हात धुण्यास आणि सुरक्षित अंतर ठेवण्यास सांगितले आहे. राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

पाहा राखी सावंतचा

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 (Rakhi Sawant Slams Kangana Ranaut over Corona Situation)

लसी घेण्याचे आवाहन

अलीकडेच कंगनाने सर्वांना व्हिडीओ शेअर करुन लस घ्यावी असे आवाहन केले आहे. कंगना म्हणाली, सध्या काय होत आहे, का घडत आहे याचा विचार करण्याचा वेळ नाही. आतापर्यंत प्रत्येक पिढीने स्पॅनिश फ्लू, टीबी सारख्या बर्‍याच आजारांशी झुंज दिली आहे, मग आपण विशेष आहोत असे आपल्याला का वाटते? येथे खूप लोकसंख्या आहे आणि प्रत्येकजण या आजाराशी झगडत आहे, म्हणून आपल्या सर्वांना लस घ्यावी लागेल.

कंगना पुढे म्हणाली, मी एक मे रोजी कुटुंब, कर्मचारी आणि मित्रांसह लस टोचून घेईन आणि तुम्ही सर्वांनीही ही लस घ्या, असे आवाहनही तिने केले आहे. कंगनाने हा व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले, महत्त्वाचा संदेश. कोरोना लस नोंदणी.

जयललितांच्या बायोपिकमध्ये दिसणार

कंगनाच्या व्यावसायिक आयुष्याविषयी बोलायचे तर ती लवकरच ‘थलायवी’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती दिवंगत नेत्या जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की, कोरोनामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. परंतु त्यानंतर कंगनाने सांगितले होते की, तिचा चित्रपट प्रथम थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. थिएटरच्या आधी हा चित्रपट कोणत्याही व्यासपीठावर प्रदर्शित होणार नाही.

(Rakhi Sawant Slams Kangana Ranaut over Corona Situation)

हेही वाचा :

Irrfan Khan Death Anniversary : माध्यमांच्या कॅमेरापासून दूर, मृत्यूपूर्वी इरफान खानने ‘या’ प्रकारे केलेली कोरोनाग्रस्तांची मदत!

Indian Idol 12 | कोरोनावर मात, खास मैत्रीण अरुणितासह पवनदीप राजनने साजरा केला वाढदिवस, पाहा फोटो

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI