Babil Khan | अनुष्का शर्माच्या चित्रपटातून बाबील खान करणार मनोरंजन विश्वात पदार्पण, चाहत्यांमध्ये उत्सुकता!

Babil Khan | अनुष्का शर्माच्या चित्रपटातून बाबील खान करणार मनोरंजन विश्वात पदार्पण, चाहत्यांमध्ये उत्सुकता!
बाबील खान आणि तृप्ती डीमरी

इरफान खानप्रमाणेच त्याचा मोठा मुलगा बबील खान यानेही अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. आता बाबील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला असून, त्याला त्याचा पहिला चित्रपट मिळाला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा बाबीलला लाँच करणार आहे.

Harshada Bhirvandekar

| Edited By: अनिश बेंद्रे

Apr 11, 2021 | 8:22 AM

मुंबई : बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) गेल्या वर्षी या जगाला निरोप देऊन निघून गेला. मात्र, चाहते अद्याप त्यांच्या लाडक्या अभिनेत्याला विसरलेले नाहीत. इरफानचा मुलगा बाबील (Babil Khan) आणि त्याची पत्नी सुतापा या अभिनेत्याची आठवण म्हणून सोशल मीडियावर नेहमी काहीना काही पोस्ट करत असतात. इरफान खानप्रमाणेच त्याचा मोठा मुलगा बबील खान यानेही अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे (Irrfan Khan son Babil Khan ready to debut in Bollywood industry).

आता बाबील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला असून, त्याला त्याचा पहिला चित्रपट मिळाला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा बाबीलला लाँच करणार आहे.

नेटफ्लिक्सचा चित्रपट

रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री तृप्ती डिमरी या चित्रपटात बाबीलसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तृप्ती डिमरीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या नव्या प्रोजेक्टबद्दल सांगितले होते. पण, आता तिने ही स्टोरी डिलीट केली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. रिपोर्ट्सनुसार चित्रपटाचे नाव काला आहे.

बाबीलने आपल्या पदार्पणाच्या पहिल्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याने सोशल मीडियावर आपल्या मित्राबरोबरचा एक चित्र शेअर केले आहे. हा फोटो शेअर करताना त्याने लिहिले, ‘मला वाटले की आपण हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, आपण स्वत:बरोबर फार सावध आणि प्रामाणिक नसल्यास आपले स्वत:चे महत्व आपल्याला व्यापून टाकेल. आपण आपल्या कथेचा एक भाग आहात आणि ती कहाणी आपल्यापेक्षा नेहमीच मोठी असेल. मग, तुम्ही अभिनेता असाल किंवा नसाल. आपला दिवस चांगला जावो.’ (Irrfan Khan son Babil Khan ready to debut in Bollywood industry)

बाबील झाला भावूक

66वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (Filmfare Awards 2021)नुकताच मुंबईत पार पडला. दिवंगत अभिनेता इरफान खान (Irrfan) याचा अंग्रेजी मीडियम चित्रपटातील भूमिकेसाठी फिल्मफेअरने सन्मान करण्यात आला. इरफानचा सन्मान त्याच्यावतीने त्याचा मुलगा बाबील खान याने स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारताना बाबील अतिशय भावूक झाला होता. वडिलांच्या आठवणी आणि त्यांचा सन्मान पाहून तो भारावून गेला होता.

पुरस्कार स्वीकारून खाली येताना तो चक्क रडू लागला, तेव्हा अभिनेता जयदीप अहलावत पुढे आला आणि त्याने बाबीलला सावरले. यावेळी जयदीपला मिठी मारून बाबील हमसून हमसून रडू लागला होता.

वडिलांच्या आठवणी जपून ठेवतोय बाबील

इरफान खानचा मुलगा बबील नेहमीच सोशल मीडियावर आपल्या दिवंगत वडिलांचे फोटो, व्हिडीओ आणि आठवणी शेअर करत असतो. जवळजवळ दररोज, तो इरफान खानची आठवण करण्यासाठी एखादी पोस्ट शेअर करतो आणि त्याला हृदयस्पर्शी कॅप्शन देखील देतो. अलीकडेच बाबीलने इरफान खानच्या डायरीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या डायरीमध्ये इरफानने लेक बाबील याच्यासाठी काही अभिनयाच्या नोट्स लिहून ठेवल्या आहेत. लवकरच बाबील बॉलिवूडमध्येही डेब्यू करणार आहे. बाबीलने लंडनच्या फिल्म स्कूलमधून पदवी शिक्षणही घेतले आहे.

(Irrfan Khan son Babil Khan ready to debut in Bollywood industry)

हेही वाचा :

Satish Kaul | ‘महाभारता’च्या ‘देवराज इंद्रा’चे निधन, कोरोनाने हिरावला आणखी अभिनेता

करीना कपूरप्रमाणे चिमुकल्या तैमूरचाही योगा, स्वतःला फिट ठेवण्यासाठी घेतोय आईकडून व्यायामाचे धडे!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें