AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इरफान खानसोबत अभिनेत्रीसोबत किसिंग सीन, दोघे होते घाबरलेल्या अवस्थेत; ती का म्हणाली, ‘निघ तू येथून…’

इरफान खान याच्यासोबत किसिंग सीन, घाबरलेली अभिनेत्री एका क्षणानंतर इरफानला म्हणाली, 'निघ तू येथून...', नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रसिद्ध आणि इरफान खान याची चर्चा...

इरफान खानसोबत अभिनेत्रीसोबत किसिंग सीन, दोघे होते घाबरलेल्या अवस्थेत; ती का म्हणाली, 'निघ तू येथून...'
| Updated on: Mar 13, 2024 | 10:35 AM
Share

मुंबई | 13 मार्च 2024 : हॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शकांची मुलगी Jennifer Lynch भारतात आली आणि तिने भारतात एक सिनेमा दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला. सिनेमाची कथा एका नागीणीवर आधारलेली आहे… जी स्वतःचा बदला घेण्यासाठी आलेली असते. सिनेमाचं नाव होतं Hisss. सिनेमात अभिनेत्री मल्लिका शेरावत मुख्य भूमिकेत होती, तर तिच्यासोबत इरफान खान आणि दिव्या दत्ता देखील महत्त्वाच्या भूमिकेत होती.

सिनेमात दिव्या आणि इरफान यांच्यामध्ये किसिंग सीन आहे. पण अभिनेत्रीसोबत किसिंग सीन देण्याआधी इरफान पूर्णपणे घाबरलेल्या अवस्थेत गच्चीत गेला…. अभिनेता गच्चीत गेल्यानंतर काय झालं… याचा खुलासा खुद्द दिव्या हिने एक मुलाखतीच्या माध्यमातून केला आहे.

अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या मनावर दडपण होतं. पण माझ्यापेक्षा अधिक इरफान घाबरलेला होता. दिग्दर्शकांनी मी विचारलं इरफान कुठे आहे. तेव्हा मला कळलं तो घबरुन गच्चीत बसला आहे. दिग्दर्शिका त्याच्याकडे गेल्या. दोघांना एका गंभीर विषयावर बोलत आहेत मला कळलं. मला असं वाटलं काय सुरु आहे आपल्याला देखील जाणून घ्यायला हवं… म्हणून दोघांना विचारलं काय सुरु आहे…’

‘इरफान मला म्हणाला चिंता करण्याची काहीही कारण नाही. मी सीन करेल… पण इरफानच्या मनात दडपण आहे… या गोष्टीचा मला आनंद होत होता.’ सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नव्हती जेव्हा इरफान आणि दिव्या एकत्र स्क्रिन शेअर करत होते.

‘दुबई रिटर्न’ सिनेमात देखील दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमा प्रदर्शित झाला नाही. शुटिंग दरम्यानचा एक किस्सा अभिनेत्रीने चाहत्यांसोबत शेअर केला. सीनबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘त्याला माझ्या घरी यायचं होतं. इरफानला पाणी प्यायल्यानंतर ग्लास मला परत द्यायचा होता. मी प्रतीक्षा करत होती कधी तो ग्लास परत करतो… पण तो काही ग्लास परत माझ्या हातात देत नव्हता. तेव्हा क्षेत्रात मी नवीन होती. काय करायचं कळत नव्हतं…’

‘मी उभी होती… कट बोलू शकत नव्हती… अशात मी विचार केला, मीच ग्लास त्याच्या हातातून घेते. तो कदाचित विसरला असेल… मी ग्लास त्याच्या हातातून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण तो ग्लास सोडतच नव्हता… तेव्हा इरफानच्या खोडकर स्वभावाबद्दल मला कळलं. अशात ग्लास फुटला आणि मी घाबरली… जेवढी मराठी येत होती मी बोलली आणि त्याला शिव्या दिल्या..’

‘मी इरफानला म्हणाली, निघ तू येथून… तो सीन मी कधीच विसरु शकत नाही… खूपच फनी सीन होता इरफान याच्यासोबत… सेटवरील प्रत्येक जण पाठकरून हसत होता… जेव्हा सीन कट झाला तेव्हा प्रत्येक जण पोट धरुन हासू लागला…’ असं अभिनेत्री म्हणाली. सांगायचं झालं तर, दिव्या आणि इमरान यांनी चार सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे.

Follow Us
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?