करीना कपूर तिसऱ्यांदा होणार आई? व्हिडीओमधील बेबी बंप पाहून सर्वच थक्क, थेट टीमने केला मोठा खुलासा
नुकताच करीना कपूरचा जीममधून बाहेर पडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिचा बेबी बंप दिसत असून अनेकांनी ती तिसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा सुरु केली आहे.

बॉलिवूडची ‘बेबो’ अर्थात अभिनेत्री करीना कपूर खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकताच तिचा जिमबाहेरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये करीना ब्लॅक जिमवेअरमध्ये दिसत असून, तिच्या लूकवरून काही नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज व्यक्त केला. काहींनी तर करीना आणि सैफ अली खान यांच्या तिसऱ्या बाळाची चर्चा सुरू केली. मात्र, या सर्व चर्चांवर आता करीना कपूरच्या टीमने स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.
करीना कपूर नुकतीच जिमच्या बाहेर स्पॉट झाली. यावेळी तिने ब्लॅक रंगाचे जिमवेअर परिधान केले होते. तिच्या हातात पाण्याची बाटली होती. करीना जिममधून बाहेर येत असताना तिच्यासोबत तिचा स्टाफही उपस्थित होता.
विशेष म्हणजे, करीना कॅमेऱ्यांपासून दिसू नये यासाठी तिचा स्टाफ छत्रीच्या मदतीने तिला झाकताना दिसला. याचदरम्यान पॅपाराझींनी तिचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांचे लक्ष तिच्या लूककडे गेले.
‘बेबो प्रेग्नंट आहे का?’ नेटकऱ्यांच्या चर्चा
व्हिडीओ पाहिल्यानंतर काही सोशल मीडिया युजर्सनी करीना कपूरच्या पोटाकडे लक्ष वेधले. काहींना तिचा बेबी बंपसारखा लूक दिसल्याने त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये तिच्या प्रेग्नन्सीबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.
एका युजरने, ‘ओह, तर ती प्रेग्नंट आहे का? की हा जुना व्हिडीओ आहे?’ असा सवाल केला. तर दुसऱ्या एका युजरने ‘हे खरं आहे का?’ अशी प्रतिक्रिया दिली. काहींनी तर ‘बाळ येणार आहे’ असं म्हणत तिसऱ्या बाळाच्या चर्चेला सुरुवात केली. मात्र, अनेक युजर्सनी हा व्हिडीओ जुना असण्याची शक्यताही व्यक्त केली. त्यामुळे सोशल मीडियावर करीना कपूरच्या प्रेग्नन्सीबाबत चर्चांना उधाण आलं.
View this post on Instagram
करीना कपूरच्या टीमने केला खुलासा
सोशल मीडियावर करीना कपूरच्या प्रेग्नन्सीच्या अफवा वेगाने पसरल्यानंतर तिच्या टीमने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना करीना कपूरच्या टीमने अभिनेत्री प्रेग्नंट नसल्याचं स्पष्ट केलं.
टीमने सांगितलं की, करीना कपूरच्या प्रेग्नन्सीबाबत सुरू असलेल्या सर्व चर्चा चुकीच्या आहेत. तिच्या लूकबाबत विनोदी अंदाज व्यक्त करत टीमने म्हटलं की, हा ‘पास्ता, पिझ्झा आणि सुट्ट्यांचा परिणाम’ असून त्यात ‘बॅड कॅमेरा अँगल’चाही वाटा आहे. त्यामुळे करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना तिच्या टीमने पूर्णविराम दिला आहे.
