AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar 2 : एकदम सेम टू सेम, तुम्हाला वाटेल की खरे नवाझ शरीफ आहेत, कोण आहे हा कलाकार? धुरंधर 2 मध्ये अजून एक कमाल

Dhurandhar 2 : धुरंधर 2 एक कमाल चित्रपट आहे. स्टोरी ही या चित्रपटाची मुख्य ताकद आहेच. पण या चित्रपटाचे अजून बरेच प्लस पॉइंट आहेत. लोक आदित्य धरला विचारतायत खऱ्या नवाझ शरीफांनी तुझ्या चित्रपटात काम केलय का?.

Dhurandhar 2 : एकदम सेम टू सेम, तुम्हाला वाटेल की खरे नवाझ शरीफ आहेत, कोण आहे हा कलाकार? धुरंधर 2 मध्ये अजून एक कमाल
Nawab Shafiq-Nawaz Sharif
| Updated on: Mar 23, 2026 | 3:44 PM
Share

आदित्य धरच्या धुरंधर 2 चित्रपटाने कमाल केलीय. लोकांना हा चित्रपट खूप आवडतोय. प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी तुटून पडलेत. बॉक्स ऑफिसवरील कमाईचा आकडा याची साक्ष देतोय. रिलीज झाल्यापासून अवघ्या चार दिवसात या चित्रपटाने आतापर्यंत 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. हा चित्रपट बाहुबलीसह अन्य काही चित्रपटांचा कमाईचा आकडा लवकरच मोडेल असं चित्र आहे. धुरंधर 2 ची स्टोरी हे या चित्रपटाचं मुख्य यश आहेच. पण यातली कलाकारांची निवड देखील तितकीच महत्वाची आहे. आदित्य धरने जे कलाकार निवडलेत ते कथानकातील प्रत्येक पात्रासाठी एकदम फिट बसलेत. या चित्रपटाच्या अगदी छोट्यातला छोटा रोल करणारा कलाकार सुद्धा प्रेक्षकांच्या डोक्यात फिट बसला आहे.

आर माधनव अजय सन्यालच्या रोलमध्ये आहे. भारताचे NSA अजित डोवाल यांच्यापासून प्रेरित असलेलं हे कॅरेक्टर आहे. या भूमिकेसाठी आर. माधवनचा जो मेकअप करण्यात आलाय. त्यावरुन तो एकदम हुबेहूब अजित डोवालच वाटतो. दुसरीकडे अजून एक पात्र आहे, ज्याला पाहिल्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची आठवण येते. खऱ्या नवाझ शरीफ यांच्या पक्षाचं नाव PML-N आहे. धुरंधर 2 मध्ये नवाझ शरीफ यांना नवाब शफीक म्हणून दाखवलं आहे. त्यांच्या पक्षाला एमएमपी नाव दिलं आहे. नवाब शफीक हे कॅरेक्टर पडद्यावर पाहताना हुबेहूब नवाझ शरीफ यांची आठवण येते.

अनेक मीम्स व्हायरल

नवाब शफीक हे खरेखुर नवाझ शरीफ वाटतात. मेकअप, चेहरा एकदम सेम टू सेम. हे खरंतर आदित्य धरच यश आहे. नवाब शफीकच हे कॅरेक्टर पाहून अनेकांनी इंटरनेटवर आदित्य धरला खऱ्याखुऱ्या नवाझ शरीफ यांनी हा रोल केलाय का? अशी विचारणा केली आहे. इंटरनेटवर यावरुन अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.

मशहूर अमरोहीने हा नवाब शफीकचा रोल केला आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक कमाल अमरोही यांचा तो नातू आहे. पाकीझा, महल, रझिया सुल्ताना या चित्रपटासाठी कमला अमरोही ओळखले जातात. मशहूरचे वडील ताजदार अमरोही हे लेखक, दिग्दर्शक होते.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ