AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhurandhar Trailer Review : धुरंधरमध्ये रणवीर सिंह खऱ्या आयुष्यातील मेजर मोहित शर्मांचा रोल साकारतोय का? कोण आहेत ते?

Dhurandhar Trailer Review : धुरंधर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर चर्चा आहे. या ट्रेलरने चित्रपटाबद्दल कुतूहल वाढवलं आहे. कारण खऱ्या कथांवर हा चित्रपट आधारित असल्याचं बोललं जातय. चित्रपटाचा मुख्य हिरो रणवीर सिंहचा लूक पाहून तो मेजर मोहित शर्मांचा रोल साकारतोय अशी चर्चा आहे.

Dhurandhar Trailer Review : धुरंधरमध्ये रणवीर सिंह खऱ्या आयुष्यातील मेजर मोहित शर्मांचा रोल साकारतोय का? कोण आहेत ते?
Mohit Sharma-Ranveer singhImage Credit source: social media
| Updated on: Nov 20, 2025 | 6:28 PM
Share

आदित्य धरच्या आगामी धुरंधर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. प्रचंड हिंसाचार असलेल्या या ट्रेलरने कुतूहल निर्माण केलं आहे. आदित्य धर चित्रपटाचा डायरेक्टर आहे. त्यासोबतच लेखक आणि निर्मात्याच्या भूमिकेत आहे. चार मिनिटाच्या या ट्रेलरने सिने रसिकांवर आपली एक वेगळी छाप उमटवली आहे. सोशल मीडियावर धुरंधरचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. चित्रपटातल्या पात्रांना नेटीझन्स खऱ्या आयुष्यातील पात्रांशी जोडत आहेत. कोणी कौतुक करतय, तर कोणी टीका. हा ट्रेलर प्रचंड दहशत निर्माण करणारा आहे. धुरंधरचा ट्रेलर पाहून काही लोकांना रणबीर कपूरच्या एनिमल चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. एनिमल मध्ये हिंसाचार, रक्तपात भरपूर होता. इतकी हिंसा असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. आजही या चित्रपटाबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. डायरेक्टर संदीप रेड्डी वांगा एनमिलचा डायरेक्टर आहे.

आता आदित्य धर धुरंधर चित्रपटातून त्यापुढचा नेक्स्ट लेवल वॉयलन्स घेऊन येतोय अशी चर्चा आहे. ट्रेलर असा असेल, तर पिक्चर कसा असेल? अशी टिप्पणी सोशल मीडियावर सुरु आहे. वास्तवात संजय दत्त, रणवीर सिंह, अक्षय खन्ना. आर.माधवन आणि अर्जुन रामपाल हे कॅरेक्टर आक्रमक स्वरुपात दाखवले आहेत. त्यांचा लूक सर्वप्रथम लक्षवेधून घेतो. त्यानंतर त्यांचा अभिनय, डायलॉग छाप उमटवतात. धुरंधर चित्रपटाची पार्श्वभूमी भारत-पाकिस्तान संघर्षाची आहे. त्यामुळे या चित्रपटातील कॅरेक्टरना खऱ्या आयुष्यातील पात्रांशी जोडलं जात आहे. चित्रपटाची चर्चा जितकी जास्त तितकच प्रमोशन जास्त हा फंडा या चित्रपटाचा आहे.

कोण होते मेजर मोहित शर्मा?

रणवीर सिंहच जे पात्र आहे, त्याचं नाव ट्रेलरमध्ये जाहीर केलेलं नाही. पण त्याच्याकडे पाहून तो भारतीय सैन्याचा पाकिस्तानातील अंडरकव्हर एजंट असल्याचं लक्षात येतं. त्याची स्टाइल, लूक पाहून तो अशोक चक्र पुरस्कार विजेते मेजर मोहित शर्मा यांची व्यक्तिरेखा साकारतोय असा अंदाज नेटीझन्सनी बांधला आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, मेजर मोहित शर्मा इफ्तिखार भट्ट बनून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी गटात शिरले. ते स्पेशल मिशनवर होते. दहशतवाद्यांचा विश्वास संपादन केला. लांब केस आणि दाढी ठेवून वेगळी ओळख बनवली. पुढे जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना ते शहीद झाले. रणवीर सिंहचा चित्रपटातील लूकही तसाच आहे. त्यामुळे तो मेजर मोहित शर्मांची अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारतयो अशी इंटरनेटवर चर्चा आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.