.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थलपती विजय यांच्यानंतर ‘हा’ मोठा स्टार राजकारणात करणार प्रवेश? तरुणांचा मोठा पाठिंबा

तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्यानंतर तमिळ सिनेसृष्टीतील आणखी एक मोठा अभिनेता राजकारणार प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चांवर आता अभिनेत्याच्या फॅन क्लबने स्पष्टीकरण दिलं आहे.

थलपती विजय यांच्यानंतर 'हा' मोठा स्टार राजकारणात करणार प्रवेश? तरुणांचा मोठा पाठिंबा
Thalapathy VijayImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 30, 2026 | 12:22 PM
Share

तमिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय यांच्या येण्याने मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर आता आणखी एक तमिळ स्टार राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. हा स्टार दुसरा-तिसरा कोणी नसून सूर्या असल्याचं म्हटलं जात आहे. एका फॅन क्लबच्या सदस्याने केलेल्या वक्तव्यामुळे सूर्या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोशल मीडियावर ही चर्चा वाढत असताना आता सूर्याच्या अधिकृत फॅन क्लबने हस्तक्षेप करून स्पष्टीकरण दिलं आहे.

अभिनेता सूर्या ‘अगारम फाऊंडेशन’च्या माध्यमातून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत करतो. या मदतीने अनेक मुलांनी शिक्षण पूर्ण केलं आहे. जर सूर्याने राजकारणात प्रवेश केला, तर तो जनतेसाठी आणखी बरंच काही करू शकेल आणि तरुण पिढी त्याला नक्कीच मतदान करेल, असं अनेकदा चाहत्यांकडून म्हटलं गेलंय. अलीकडेच आर. वीरमणी हे ‘ऑल इंडिया सूर्या वेलफेअर असोसिएशन’च्या राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या एका सल्लागार बैठकीला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सूर्याला लोकनेता बनण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, असं वक्तव्य त्यांनी या बैठकीत केलं होतं. यावरून अनेकांनी असा अंदाज लावला की सूर्या खरोखरच राजकारणात प्रवेश करणार आहे. या चर्चांना उधाण येताच वीरमणी यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून स्पष्टीकरण दिलं.

फॅन क्लबचं स्पष्टीकरण-

“मी व्यक्त केलेली मतं ही माझी वैयक्तिक मतं होती. मी सुरुवातीलाच स्पष्ट केलं होतं की यासाठी सूर्या वेलफेअर असोसिएशन किंवा स्वत: सूर्या जबाबदार राहणार नाहीत. मात्र माझ्या भाषणाचा एक केवळ छोटा भाग व्हायरल झाल्यामुळे अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, माझ्या वक्तव्याचा सूर्या किंवा सूर्या वेलफेअर असोसिएशनशी काहीही संबंध नाही”, असं वीरमणी यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर सूर्याच्या फॅन क्लबनेही निवेदन जारी केलं. वीरमणी गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्या प्रशासकीय टीमचा भाग नव्हते आणि सोशल मीडियावर पसरत असलेल्या कोणत्याही चर्चांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन फॅन क्लबने केलं आहे. यावेळी त्यांनी अफवांना नाकारत स्पष्टपणे सांगितलं की, सूर्याचा राजकारणात येण्याचा कोणताही हेतू नाही.

तमिळ चित्रपटसृष्टी आणि राजकारण यांच्यातील वाढत्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना अधिक उधाण आलं होतं. तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय हे अनेक वर्षांपासून त्यांच्या फॅन क्लब आणि कल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांचं एक मजबूत जाळ तयार करत होते. त्यातूनच त्यांनी ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. त्यामुळे सूर्यासुद्धा थलपती विजय यांच्यापाठोपाठ राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा पसरल्या होत्या.

Follow Us
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा