.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठ दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे दिली होती हिंट, ब्रेकिंग न्यूज मिळेल अन् ठाकरेंना दिला दुसरा झटका… नेमकं काय घडलं?

Sachin Ahir : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता दुसरा धक्का बसला आहे. सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्या नंतर आता विधान परिषदेचे आमदार सचिन आहिर यांनी देखील ठाकरेंची शिवसेना सोडली आहे.

आठ दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे दिली होती हिंट, ब्रेकिंग न्यूज मिळेल अन् ठाकरेंना दिला दुसरा झटका... नेमकं काय घडलं?
Eknath ShindeImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 30, 2026 | 12:18 PM
Share

महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने नाट्यमय घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेते प्रवेश केला. ठाकरेंसाठी हा मोठा धक्का होता. त्या पाठोपाठ आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आठ दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात भाषण करताना स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं, “थोडं थांबा, ब्रेकिंग न्यूज मिळेल…” आणि त्यानंतर जे घडलं, त्याने शिवसेना (UBT) नेते उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

सचिन आहिर शिंदेंच्या शिवसेनेत

गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या ‘ब्रेकिंग न्यूज’चा संदर्भ आता स्पष्ट झाला आहे. शिवसेने (शिंदे गट) ने उद्धव ठाकरे गटातील एका प्रमुख नेत्याला आपल्या पक्षात सामील करून घेतलं आहे. विधान परिषदेचे आमदार सचिन आहिर यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. या प्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची ताकद कमकुवत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, हा पक्षप्रवेश अगदी अचानक आणि नियोजित रणनीतीनुसार घडला असल्याचे दिसत आहे.

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले होते?

आठ दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी जेव्हा ‘थोडं थांबा, ब्रेकिंग न्यूज येणार आहे’ असे म्हटले, त्यावेळी अनेकांना त्याचा अर्थ कळला नव्हता. मात्र आता स्पष्ट झाले आहे की, शिंदे गटाने ठाकरेंच्या गटातील नेत्यांना आकर्षित करण्यासाठी गुप्त चर्चा सुरू केल्या होत्या. या चर्चेचा भाग म्हणून हा मोठा फटका ठाकरे गटाला बसला आहे.

ठाकरे गटात अस्वस्थता

या घटनेमुळे शिवसेना (UBT) मध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. पक्षातील नेते आणि कार्यकर्ते एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत आहेत. काही नेत्यांनी यावरून पक्ष नेतृत्वावर टीका देखील केली आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीही अनेक नेत्यांना गमावले असल्याने, हा नवा धक्का त्यांच्या पक्षासाठी अतिरिक्त आव्हान ठरला आहे.

Follow Us
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा