AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द, प्रियांका चोप्राच्या बहिणीने आंदोलकांना झापलं, म्हणाली..

'ही आजची पिढी की...', 20 जुलै रोजी कॉक्रोच जनता पार्टीने जंतरमंतर येथून संसदेपर्यंत मोर्चा पुकारला. दरम्यान, आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी केला. यावर अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या बहिणीने संताप व्यक्त करत आजच्या पिढीवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

पंतप्रधान मोदींविरोधात अपशब्द, प्रियांका चोप्राच्या बहिणीने आंदोलकांना झापलं, म्हणाली..
अभिनेत्री मीरा चोप्रा
| Updated on: Jul 24, 2026 | 8:51 AM
Share

नीट पेपरफुटीनंतर देशात सर्वत्र तरुण – तरुणी त्यांच्या हक्कांसाठी एकत्र येत आंदोलन करत आहे. कॉक्रोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांना समर्थन दर्शवत तरुण रस्त्यावर उतरले आहेत. अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय पक्षांनी देखील सीजेपी आंदोलकांना पाठिंबा देत, तुमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मागे हटू नका… असं सांगितलं आहे… तर सीजेपी आंदोलकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नारे दिल्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. ज्यावर अनेकांनी आक्षेप देखील घेतला आहे. आता अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची बहीण आणि अभिनेत्री मीरा चोप्रा हिने देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे; एका निदर्शनादरम्यान ‘सीजेपी’च्या (CJP) एका आंदोलकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कथितरीत्या अपशब्द वापरल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले.

एक्सवर व्हिडीओ रिशेअर करत मीरा चोप्रा हिने आजच्या पिढीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. मीरा व्हिडीओवर स्वतःची प्रतिक्रिया देत म्हणाली, ‘ही आजची तरुण पिढी आहे का? NEET परीक्षेचे विद्यार्थी आहेत? कृपया मला सांगा, ही नक्की कोणत्या प्रकारची तरुण पिढी आहे? असं मीरा म्हणाली. तिच्या या ट्विटवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात होणाऱ्या नारेबाजीपूर्वी मीरा हिने निदर्शनांमध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांचे जाहीरपणे समर्थन केलं होतं आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं होतं. विद्यार्थ्यांना देशाचं भविष्य असं म्हणलं जातं, पण त्यांच्या म्हणण्याकडे देखील लक्ष देणं फार गरजेचं आहे… काही रजकीय पक्षांनी या आंदोलनाचा वापर स्वतःच्या हितासाठी करण्यास देखील सुरुवात केली आहे. त्यामुळे विद्यर्थ्यांनी त्यांच्या राजकारणाचा मोहरा बनू नये… असं देखील मीरा हिने म्हटलं होतं. सांगायचं झालं तर, विद्यर्थ्यांच्या या आंदोलनाचे अनेक सेलिब्रिटींनी समर्थन केलं आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच