AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला ते सहन होणार नाही..; सून गौहरच्या कामाविषयी इस्माइल दरबारचं वक्तव्य चर्चेत

इस्माइल दरबार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सून गौहर खानच्या काम करण्याबाबत थेट आक्षेप व्यक्त केला. इतकंच नव्हे तर मी तिचं काम पाहत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. यामागचं कारण त्यांनी काय सांगितलं.. ते वाचा..

मला ते सहन होणार नाही..; सून गौहरच्या कामाविषयी इस्माइल दरबारचं वक्तव्य चर्चेत
झैद दरबार- गौहर खान, इस्माइल दरबारImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 09, 2025 | 3:36 PM
Share

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध संगीतकार इस्माइल दरबार यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सून आणि अभिनेत्री गौहर खानच्या काम करण्याबाबत थेट आक्षेप व्यक्त केला. ‘बिग बॉस’ फेम गौहरने इस्माइल यांचा मुलगा झैद दरबारशी लग्न केलंय. या दोघांना दोन मुलं आहेत. विक्की लालवानीला दिलेल्या मुलाखतीत इस्माइल यांनी स्पष्ट केलं की ते जुन्या विचारांचे आहेत. गौहर लग्नानंतर आणि आई झाल्यानंतरही इंडस्ट्रीत काम करत असल्याचं त्यांना मान्य नाही. इतकंच नव्हे तर सुनेचं काम मी पाहतच नाही, असंही त्यांनी सांगितलं.

या मुलाखतीत ते म्हणाले, “गौहरबद्दल मला फक्त इतकंच माहीत आहे की झैदसोबत तिचं खूप चांगलं नातं आहे. पहिल्या मुलाचं संगोपन त्या दोघांनी मिळून खूप चांगल्या पद्धतीने केलं.” यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, त्यांनी गौहरचे चित्रपट पाहिलेत का? त्यावर उत्तर देताना त्यांनी पुढे सांगितलं, “माझ्या कुटुंबाची विचारसरणी थोडी जुनी आहे. मी अशा वातावरणात मोठा झालो आणि राहिलोय. आता गौहर आमच्या घराची अब्रू आहे तर मी तिला थेट बोलू शकत नाही की, तू काम बंद कर. तो माझा अधिकार नाही. तो तिच्या पतीचा म्हणजेच झैदचा अधिका आहे.”

View this post on Instagram

A post shared by Gauahar Khan (@gauaharkhan)

“म्हणूनच मी कधी तिचं काम पाहत नाही. कारण जर पाहिलं तर माझ्याने ते सहन होणार नाही. माझी पत्नी आयेशाने मुलांच्या जन्मानंतर काम करणं बंद केलं होतं. त्यावेळी ती शोच्या माध्यमातून पाच लाख रुपये प्रति महिना कमवत होती. तिला मुख्य अभिनेत्रीचीही ऑफर मिळाली होती. तिने कधीच म्हटलं नव्हतं की तिला गाणं गायचं आहे किंवा परफॉर्म करायचं आहे. जेव्हा मला पैशांची गरज होती, तेव्हासुद्धा तिने कमावण्याचा हट्ट धरला नव्हता”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.

गौहर खानने डिसेंबर 2020 मध्य झैद दरबारशी निकाह केला होता. दोन वर्षांपूर्वी मे 2023 मध्ये तिने मुलाला जन्म दिला. नुकतीच ती दुसऱ्यांदा आई बनली. सप्टेंबर 2025 मध्ये तिने पुन्हा मुलाला जन्म दिला.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या