प्रभासच्या ‘या’ चित्रपटाच्या एका सीनसाठी मोजले तब्बल इतके कोटी!

सुपरस्टार अभिनेता प्रभास (Prabha) आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत.

प्रभासच्या 'या' चित्रपटाच्या एका सीनसाठी मोजले तब्बल इतके कोटी!

मुंबई : सुपरस्टार अभिनेता प्रभास (Prabhas) आणि अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) यांचा ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. अलीकडेच चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला होता, जो प्रेक्षकांनी खूपच पसंत केला आहे. आता या चित्रपटाविषयी एक मोठी बातमीसमोर येत आहे.(It cost 1.5 crore to shoot a scene from Prabhas’ Radhe Shyam movie)

चित्रपटातील एक सीन पूर्ण करण्यासाठी तब्बल 1.5 कोटी रूपये खर्च आल्या असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटातील काही मिनिटांच्या शूटसाठी एक खास सेट तयार करण्यात आला होता. 2018 मध्ये चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात प्रभाससोबत पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रभासने नुकताच व्हॅलेंटाईन डेची भेट म्हणून चाहत्यांना या चित्रपटातील एक झलक दाखवली होती.

या चित्रपटात प्रभास रोमँटिक लूकमध्ये दिसत आहे. टीझरच्या व्हिडिओमध्ये प्रभास रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर इटालियन भाषेत आपल प्रेम व्यक्त करताना दिसत होता. हा व्हिडीओ 5 भाषांमध्ये तेलुगु, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत शेअर करण्यात आला आहे. राधे श्याम’ हा चित्रपट 30 जुलै 2021 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

प्रभास आणि पूजा व्यतिरिक्त या चित्रपटात सचिन खेडेकर, भाग्यश्री, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा शॉर्ट प्री टीझर रिलीज झाला होता. टीझरची सुरूवात प्रभासच्या बाहुबली लूकपासून झाली होती त्यानंतर ‘साहो’ चित्रपटाचा एक सीन ज्यामध्ये प्रभास रस्त्यावर फिरताना दिसत होता.

संबंधित बातम्या : 

…तर अमिताभ बच्चन-अक्षयकुमारच्या सिनेमांचं शूटिंग-प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नाही : नाना पटोले

सनी लिओनचा निळा स्विमसूट इंटरनेटवर चर्चेत, लूक पाहून चाहतेही घायाळ!

जया बच्चन मराठी सिनेमात पहिल्यांदाच काम करणार; सात वर्षानंतर फिल्मी दुनियेत कमबॅक

(It cost 1.5 crore to shoot a scene from Prabhas’ Radhe Shyam movie)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI