…तर अमिताभ बच्चन-अक्षयकुमारच्या सिनेमांचं शूटिंग-प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नाही : नाना पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पटोलेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. (Nana Patole Amitabh Bachchan Akshay Kumar )

...तर अमिताभ बच्चन-अक्षयकुमारच्या सिनेमांचं शूटिंग-प्रदर्शन महाराष्ट्रात होऊ देणार नाही : नाना पटोले
अमिताभ बच्चन, नाना पटोले, अक्षयकुमार
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 2:01 PM

भंडारा : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे. (Nana Patole warns Amitabh Bachchan Akshay Kumar wont be permitted to shoot release Movies in future)

मनमोहन सरकारच्या काळात सिने अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार ट्विटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांनाही विसर पडल्याने भविष्यात काँग्रेस अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटांचे चित्रिकरण महाराष्ट्रात होऊ देणार नाही तसेच त्यांचे सिनेमे प्रदर्शितही होऊ देणार नाही, असा सक्त इशारा नाना पटोले यांनी दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर पटोलेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे.

नाना पटोलेंचे जंगी स्वागत

नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच भंडारा जिल्ह्यात आले होते. काँग्रेस कार्यकत्यांनी त्यांचे जंगी स्वागत करुन फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांचा वर्षाव केला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात नाना पटोले यांच्या नेतृत्वात लाखनी ते भंडारा ट्रॅक्टर मार्चसह पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.

“अमिताभ बच्चन-अक्षय कुमार गप्प का?”

देशात आता पेट्रोलने शंभरी गाठली आहे. पण तरीही इंधन दरवाढीवरून कोणी बोलायला तयार नाहीत. काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढीवरून टीव टीव करणारे सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार आता गप्प का आहेत? आता त्यांना इंधन दरवाढ दिसत नाही का? असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी कालच केला होता. (Nana Patole warns Amitabh Bachchan Akshay Kumar wont be permitted to shoot release Movies in future)

“मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात हिंमत नाही का?”

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. त्याचवेळी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावरही टीका केली. यूपीएचे सरकार लोकशाही मार्गाने चालणारे सरकार होते. त्यावेळी 70 रुपये लिटर पेट्रोल झाले तेव्हा अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार आणि इतर सेलिब्रिटींनी त्या इंधन दरवाढीविरोधात ट्विट करून संताप व्यक्त केला होता. आता पेट्रोलने शंभरी गाठली असतानाही अमिताभ बच्चन, अक्षयकुमारसह एकाही सेलिब्रिटीने त्याविरोधात ट्विट का केले नाही, ते आता गप्प का आहेत? मोदी सरकारच्या हुकूमशाही विरोधात बोलण्याची त्यांची हिंमत होत नाही का? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला होता. मोदी सरकारने इंधन व गॅस दरवाढ तात्काळ कमी करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित बातम्या :

आमची सत्ता असताना इंधन दरवाढीवर टीव टीव करणारे अमिताभ, अक्षय गप्प का?; नाना पटोलेंचा सवाल

नितीन राऊतांचं ऊर्जा खातं नाना पटोलेंकडे जाणार? दोघेही एकाच वेळेस सोनियांच्या भेटीला

(Nana Patole warns Amitabh Bachchan Akshay Kumar wont be permitted to shoot release Movies in future)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.