अंकशास्त्र नाही, ‘या’ कारणाने Irrfan Khan ने आपल्या नावात R वाढवला होता!

यश मिळवण्याच्या उद्देशाने बरेच जण आपल्या नावात एखादे जास्तीचे अल्फाबेट लावत असल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र इरफानच्या नावातील अतिरिक्त 'आर' हा अंकशास्त्रामुळे नव्हता (Story Behind Bollywood Actor Irrfan Khan changed name)

अंकशास्त्र नाही, 'या' कारणाने Irrfan Khan ने आपल्या नावात R वाढवला होता!
Follow us
| Updated on: Apr 29, 2020 | 3:08 PM

मुंबई : दर्जेदार अभिनयाने प्रत्येक व्यक्तिरेखेला वेगळा आयाम देणारा हरहुन्नरी बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या निधनाची बातमी सर्वांना चटका लावणारी आहे. इरफानने गाजवलेल्या भूमिका आणि त्याच्या आठवणींना बॉलिवूड कलाकारांपासून सर्वसामान्य प्रेक्षक उजाळा देत आहेत. इरफान खानच्या बदललेल्या नावामागची कहाणी जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. (Story Behind Bollywood Actor Irrfan Khan changed name)

इरफानचं खरं नाव साहबजादे इरफान अली खान. त्याचा जन्म राजस्थानच्या जयपूरमध्ये 7 जानेवारी 1967 रोजी एका मुस्लिम पठाण कुटुंबात झाला. त्याचे वडील जागिरदार खान हे टोंक जिल्ह्याजवळील खजुरिया गावचे रहिवासी होते. तर त्याची आई, बेगम खान या टोंकमधील हकीम कुटुंबातील होत्या. इरफानचे वडील टायरचा व्यवसाय करत होते.

सर्वसामान्यपणे बॉलिवूड कलाकार अंकशास्त्रानुसार आपल्या स्पेलिंगमध्ये बदल करतात. यश मिळवण्याच्या उद्देशाने बरेच जण आपल्या नावात एखादे जास्तीचे अल्फाबेट लावत असल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र इरफानच्या नावातील अतिरिक्त ‘आर’ हा अंकशास्त्रामुळे नव्हता.

2012 मध्ये इरफानने ‘आर’ जोडून आपलं नाव बदललं, याचं कारण खूप रंजक आहे. ‘आर’ अक्षराचं नादमाधुर्य आवडल्याने इरफानने आपलं स्पेलिंग बदलल्याचं तो सांगायचा. इरफानच्या भूमिका त्याआधीपासूनच प्रेक्षकांना रुचल्या होत्या. नाव बदलल्यानंतर मिळालेलं यश हे त्याच्या अभिनयाच्या खणखणीत नाण्यामुळे, यात शंका नाही.

चुटपूट लावणारी एक्झिट

वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी इरफान खानने अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने काल त्याला मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिथेच उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. दोन वर्षांपासून इरफान न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने त्रस्त होता.

आजारपणानंतर इरफान पुनरागमन करण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा प्रदर्शितही झाला, मात्र ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा उतरवण्यात आला.

तीनच दिवसांपूर्वी इरफान खानच्या मातोश्रींचं निधन झालं होतं. इरफान त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकला नव्हता. त्यातच इरफानच्या निधनाची बातमी समोर आली आहे.

हेही वाचा : तीन दिवसांपूर्वी इरफान खानच्या आईचे निधन, आईची शेवटची इच्छाही अपूर्ण

‘चाणक्य’ या मालिकेद्वारे इरफानने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. चंद्रकांता, तसेच ‘द ग्रेट मराठा’ या मालिकांमध्येही त्याने भूमिका केली होती. ‘सलाम बॉम्बे’ हा त्याचा पहिला सिनेमा. त्यानंतर हासिल, मकबूल, चरस, बिल्लू, लंचबॉक्स, तलवार, लाईफ इन अ मेट्रो, पिकू, गुंडे, हैदर, सात खून माफ, पानसिंग तोमर, मदारी, हिंदी मीडियम, अंग्रेजी मीडियम असे त्याचे असंख्य सिनेमा गाजले आहेत. लाईफ ऑफ पाय, स्लमडॉग मिलिनिअर, ज्युरासिक पार्क 2, द अमेझिंग स्पायडरमॅन, द वॉरियर, द नेमसेक अशा हॉलिवूडपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत. (Story Behind Bollywood Actor Irrfan Khan changed name)

2011 मध्ये त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2013 मध्ये पानसिंग तोमर चित्रपटातील भूमिकेसाठी इरफानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता.

संबंधित बातम्या :

Irrfan Khan | इरफान खानच्या निधनाने अजितदादाही गहिवरले

Irrfan Khan| लढवय्या इरफान खानला नेमकं काय झालं होतं?

Irrfan Khan | पानसिंग तोमर ते लाईफ ऑफ पाय, इरफान खानचे गाजलेले चित्रपट

Irrfan Khan | इरफान खान यांचे निधन, बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत प्रवास

प्रख्यात बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचं निधन

(Story Behind Bollywood Actor Irrfan Khan changed name)

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.