AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Irrfan Khan | इरफान खानच्या निधनाने अजितदादाही गहिवरले

कॅन्सरसारख्या आजारावर मात करुन इरफान खान यांनी आपल्यातला लढाऊपणा दाखवून दिला होता, अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या (Ajit Pawar condolences on Irrfan Khan death)

Irrfan Khan | इरफान खानच्या निधनाने अजितदादाही गहिवरले
| Updated on: Apr 29, 2020 | 1:43 PM
Share

मुंबई : अभिनेता इरफान खान यांचं निधन हे भारतीय चित्रपटसृष्टीसाठी, कलाजगतासाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या अकाली निधनमुळे एक दमदार अभिनेता, संवेदनशील माणूस, लढाऊ व्यक्तिमत्व गमावल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. (Ajit Pawar condolences on Irrfan Khan death)

लाईफ ऑफ पाय, बिल्लू, हिंदी मिडीयम, पिकू, पानसिंग तोमर अशा एकापेक्षा एक चित्रपटात दर्जेदार अभिनयाने आपल्या भूमिकांना वेगळा आयाम देणारे हरहुन्नरी बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचं निधन झाल्याची दु:खद बातमी समोर आली आहे. वयाच्या अवघ्या 53 व्या वर्षी इरफाननी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने काल त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दोन वर्षांपासून इरफान न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमरने त्रस्त होते.

‘सहजसुलभ अभिनयातून साकारलेल्या विविधांगी व्यक्तिरेखांमुळे इरफान खान कायम रसिकांच्या स्मरणात राहतील. अभिनेता म्हणून इरफान खान निश्चितच महान होते. त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका त्यांच्या अष्टपैलू अभिनय कौशल्याची साक्ष देतात’, असं अजित पवार म्हणतात.

हेही वाचा : Irrfan Khan| लढवय्या इरफान खानला नेमकं काय झालं होतं?

‘कॅन्सरसारख्या आजारावर मात करुन इरफान खान यांनी आपल्यातला लढाऊपणा दाखवून दिला होता. परंतु आज अचानक आलेली त्यांच्या निधनाची बातमी ही माझ्यासारख्या असंख्य चित्रपट रसिकांसाठी, त्यांच्या चाहत्यांसाठी क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो’, असं उपमुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे. (Ajit Pawar condolences on Irrfan Khan death)

मार्च 2018 मध्ये इरफान यांना कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं होतं. आजारपणानंतर इरफान पुनरागमन करण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यांचा अंग्रेजी मीडियम हा सिनेमा प्रदर्शितही झाला, मात्र ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर हा सिनेमा उतरवण्यात आला.

हेही वाचा : Irrfan Khan | पानसिंग तोमर ते लाईफ ऑफ पाय, इरफान खानचे गाजलेले चित्रपट

तीनच दिवसांपूर्वी इरफान खानच्या मातोश्रींचं निधन झालं होतं. इरफान त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यातच इरफानच्या निधनाची चटका लावणारी बातमी समोर आली आहे.

(Ajit Pawar condolences on Irrfan Khan death)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.